कोकण

जीवनमान सुधारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यरत

CD

१४ (निवडणूक पानासाठी)

सर्वांगीण विकास भाजपच करू शकतो

नारायण राणे ः पावस, गोळप गटात कार्यकर्ता मेळावा

सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. २ : देशाला महासत्ता बनवत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महिला, युवक, शेतकरी आणि गरिबांचे जीवनमान सुधारण्यासाठी कार्यरत आहेत. यावर बोलण्याचे कुठलेच मुद्दे विरोधकांकडे नाहीत. ते जातीभेद निर्माण करत आहेत; मात्र पंतप्रधान मोदींनी नेहमीच माणुसकीचा धर्म जपत काम केले आहे. त्यामुळे असे नेतृत्व पुन्हा या देशाला मिळाले पाहिजे. सर्वांगीण विकास भाजपच करू शकतो, असे प्रतिपादन भाजप महायुतीचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे उमेदवार नारायण राणे यांनी केले.
रत्नागिरी तालुक्यातील पावस व गोळप जिल्हा परिषद गटात आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. राणे म्हणाले, कुठलेही मुद्दे नसल्यामुळे विरोधक फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत. संविधान बदलणार, असा अपप्रचार सुरू आहे; पण पंतप्रधानांनी कधीच जातीभेद, धर्मभेद केला नाही. मोफत अन्न, मोफत घर, औषध पाण्यासाठी, शेतकऱ्यांसाठी त्यांनी काम केले. या वेळी मंत्री उदय सामंत, शिवसेना तालुकाप्रमुख बाबू म्हाप, महिला आघाडीच्या कांचन नागवेकर, भाजपचे नाना शिंदे, माजी सरपंच लाईक फोंडू, शिवसेना पावस विभागप्रमुख विजय चव्हाण आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Gas Crematorium Closed : पुण्यातील स्मशानभूमीला इराण- इस्रायल युद्धाच्या झळा; गॅस दाहिन्या बंद, अंत्यसंस्कार वेटिंगवर

Bavdhan Bhairavnath Yatra : 10 बैलजोड्यांनी ओढला 40 फुटी रथ! बावधनच्या बगाड यात्रेचे हे खास वैशिष्ट्य तुम्हाला माहीत आहे का? 16 वर्षांपूर्वीचा 'तो' नवस फेडण्यासाठी...

Whatsapp Chat Recovery : डिलीट झाली Whatsapp चे महत्वाचे चॅट? आता टेंशन घेऊ नका; मिनिटात मिळेल परत, नव्या सुविधेने युजर्स चक्रावले

T20 World Cup: हार्दिक पांड्याने सांगितला भविष्यातील प्लॅन! म्हणाला, तीन ICC ट्रॉफी जिंकल्या आहेत, आता...

Sayali Surve Gharwapsi : प्रेमासाठी बदलला धर्म! 10 वर्षात झाली 4 मुलं, पण नवऱ्यानं..; पुण्यातील सायलीची हिंदू धर्मात वापसी, तिच्यासोबत सासरी असं काय घडलं?

SCROLL FOR NEXT