कोकण

उच्च दर्जाच्या गुणवत्तेला नेहमीच संधी

CD

94713

उच्च दर्जाच्या गुणवत्तेला नेहमीच संधी
प्रा. दिवाकर मुरकर : कुंभवडे देसाई कनिष्‍ठ महाविद्यालयात पालक सभा
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ४ : क्षेत्र कोणतेही असो विद्यार्थ्यांनी उच्च दर्जाची गुणवत्ता प्राप्त केली तर बेकारी शिल्‍लक राहणार नाही, असे प्रतिपादन कुंभवडे येथील देसाई कनिष्‍ठ महाविद्यालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. दिवाकर मुरकर यांनी केले.
श्री. मुरकर म्‍हणाले, पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या संवादामधून विद्यार्थ्यांमधील शैक्षणिक गुणवत्ता विस्तारत जात असते आणि विस्तारत जाणारी ही गुणवत्ताच विद्यार्थ्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगासारख्या परीक्षांच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेपर्यंत नेऊ शकते. तुम्हाला नोकऱ्या देण्यासाठी तुमच्या दारापर्यंत कोणीही येणार नाही. तुम्हाला तुमच्या मधील गुणवत्ता सिद्ध करून नोकरीच्या स्थळापर्यंत मजल मारण्याची ताकद तुम्ही तुमच्या मध्ये निर्माण केली पाहिजे.
अखिल कुंभवडे ग्रामविकास मंडळ संचलित देसाई विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या नाना प्रभुदेसाई सभागृहात पालक सभा झाली. यात प्रा. मुरकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शाळा समितीचे अध्यक्ष प्रसाद दिलीप देसाई, कुंभवडे सरपंच आग्रे, शाळा समिती सदस्य सुनील तांबे, रवींद्र मयेकर, तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष नंदू मेस्त्री, मुख्याध्यापक नारायण कोले, प्रा. नारायण राणे आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक नारायण कोले यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन राजाभाऊ मुंढे यांनी तर आभार विजय बाणे यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FIFA World Cup 2026: सर्वोत्तम खेळाडूचा 'गोल्डन बूट' कोणाला? मेस्सी, रोनाल्डोसह हे खेळाडू प्रमुख दावेदार

Cancer Drug Price Hike: कॅन्सर उपचार होणार महाग! जीवनावश्यक औषधांच्या किमती 50% पर्यंत वाढण्याची शक्यता; केंद्र सरकारची मंजुरी

घाटकोपरमध्ये पांढऱ्या पट्टीच्या वादावर पडदा, रंगाच्या पट्ट्या मारत काढला तोडगा

Vidarbha Schools: विदर्भात 30 जूनला वाजणार शाळांची घंटा; न्यायालयाचे आदेश, शासनाचे सुधारित पत्र निघणार

Latest Marathi News Live Update : नाशिक विधान परिषद निवडणुकीत गोकुळ गिते माघार घेण्याच्या तयारीत?

SCROLL FOR NEXT