कोकण

आमदार साळवींच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

CD

-rat६p५.jpg -
२४M९५१०७
राजन साळवी
-----------
आमदार राजन साळवी यांच्या
वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

लांजा, राजापूर, रत्नागिरीत कार्यक्रम; कॅरम, नांगरणी स्पर्धा

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ६ ः शिवसेना उपनेते आणि राजापूर-लांजा विधानसभा मतदार संघाचे आमदार राजन साळवी यांचा वाढदिवस मंगळवारी (ता.९) रत्नागिरी शहर आणि विधानसभा मतदार संघामध्ये विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.
रविवारी (ता. ७) लांजा येथील कुणबी सेवासंघाच्या सभागृहात लांजा तालुका कॅरम असोसिएशनच्यावतीने रत्नागिरी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा घेण्यात येणार आहे. सोमवारी (ता. ८) दाभोळे जिल्हा परिषद, साखरपा विभाग शिवसेना, महिला आघाडी, युवसेनेच्यावतीने कोंडगाव बाजारपेठ येथे नांगरणी स्पर्धेसह विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १०.३० वा. बाळासाहेब ठाकरे सभागृहात अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. लांजा येथे सकाळी १० ते दुपारी २ वा. युवा सेनेच्यावतीने लांजा हायस्कूलमध्ये वक्तृत्व स्पर्धा, सायंकाळी ४ वा. प्रवीण शेट्ये यांच्यावतीने वाकेड शाळेत वह्या वाटप करण्यात येणार आहे. ९ जुलैला लांजा शिवसेना, महिला आघाडी व युवासेनेच्यावतीने विविध माध्यमिक शाळांमध्ये वह्यांचे वाटप करण्यात येणार आहे. शिवसेना युवती तालुकाधिकारी दीपाली दळवी यांच्या नेतृत्वाखाली वेरळ शाळेत शिवसेना व युवा सेनेच्यावतीने नारळाच्या झाडाचे वाटप, प्राथामिक शाळेतील विद्यार्थांना खाऊ, बांधकाम कामगार कल्याण कार्डचे वाटप करण्यात येणार आहे. दुपारी ३ वा. लांजा येथील गणेश मंगल कार्यालय येथे अभिष्टचिंतन सोहळा होईल.
राजापूर तालुक्यामध्ये सकाळी ८ वा. धूतपापेश्वर मंदिर येथे अभिषेक सोहळा, ८.३० वा. जिल्हास्तरीय राजापूर मॅरेथॉन स्पर्धा जवाहर चौक ते शीळदरम्यान होईल. १०.३० वा. छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे अभिष्टचिंतन व पदाधिकारी व लोकप्रतिनिधींचा सन्मान सोहळा, रत्नागिरी तालुक्यामध्ये सकाळी ९ वा. रत्नागिरी शिवसेनेच्यावतीने श्रीदेव भैरी मंदिर येथे अभिषेक सोहळा, जिल्हा शिवसेनाप्रणित रिक्षा/टॅक्सी, शिवसंस्कार विद्यार्थी वाहतूक सेनेच्यावतीने वह्या वाटप, सायं. ७ वा. अभिष्टचिंतन सोहळा होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ Final Live Telecast: आज ठरणार विश्वविजेता! सामना किती वाजता आणि फ्री लाईव्ह कुठे पाहायचा? वाचा पूर्ण डिटेल्स

Latest Marathi News Live Update : वकील महिलेला न्यायालय परिसरात मारहाण

Operation Sindoor Book Review : भारतीय संरक्षण दलांची अभूतपूर्व शौर्यगाथा

New Marathi Book : ‘तर्कतीर्थां’च्या व्यक्तिमत्त्वाचा समग्र धांडोळा

The Roses Movie Review : प्रेमाच्या गुलाबाबरोबर काट्याची नर्मविनोदी कथा

SCROLL FOR NEXT