कोकण

मुसळधार पाऊस असूनही मांगेली मात्र ''हाऊसफुल''

CD

मुसळधार पाऊस असूनही
मांगेली मात्र ‘हाऊसफुल’

सकाळ वृत्तसेवा 
दोडामार्ग, ता. ७ ः तालुक्याला आज पावसाने अक्षरशः झोडपून काढले असतानासुद्धा  मांगेलीत मात्र हजारो पर्यटकांनी वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी हजेरी लावली. त्यामुळे मांगेलीचे वर्षापर्यटन यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच चांगले फुलले होते.
कर्नाटक-महाराष्ट्र आणि गोवा या तीन राज्यांच्या सीमेवरील मांगेली वर्षा पर्यटनासाठी प्रसिध्द आहे. मांगेली-फणसवाडी येथील धबधबा सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आला आहे. त्यामुळे दरवर्षी गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र या तिन्ही राज्यातील पर्यटक मोठ्या संख्येने मांगेलीत येऊन वर्षा पर्यटनाचा आनंद लुटतात. शनिवार व रविवारी तर मोठी गर्दी पहायला मिळते. आज रविवारी तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत असतानासुद्धा मांगेलीत वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येण्याचा मोह पर्यटकांना आवरता आला नाही. त्यामुळे हजारोंच्या संख्येने दाखल झालेल्या पर्यटकांमुळे यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच मांगेली हाऊसफुल्ल झाली होती. गोव्यातील पर्यटकांचा यात जास्तीचा सहभाग होता. 
95522

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

डीसीपींनी गुंडाला धो-धो धुतला! कल्याणच्या ‘सिंघम’ची धडक कारवाई; व्हिडीओ व्हायरल

Sangli Crime : हमाल नेत्याच्या नातवाचा गोळ्या घालून खून; रेल्वे मालधक्का ठेक्याच्या वादातून कुख्यात गुंडाचे कृत्य

Congress NCP Merger: काँग्रेसकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला विलीनीकरणाचा प्रस्ताव?, तीन आमदार भाजपच्या वाटेवर?

Walchandnagar News : लासुर्णेच्या पृथ्वीराज मुळीक याचे सैन्यदलात भरतीचे स्वप्न साकार; लेफ्टनंटपदाच्या प्रशिक्षणासाठी झाली निवड

RBI च्या निर्णयाचा परिणाम! SBI आणि बँक ऑफ बडोदाकडून व्याजदरात वाढ; पण कोणत्या आणि किती?

SCROLL FOR NEXT