rat18p4.jpg
57965
देवरूख ः मार्लेश्वर येथे श्रावण सोमवारी गर्दी झाल्याने पोलिस बंदोबस्त ठेवला होता.
rat18p5.jpg-
57966
मार्लेश्वर दर्शनासाठी झालेली गर्दी.
--------------
मार्लेश्वरात घुमला ‘हर हर महादेव’चा जयघोष
श्रावणी सोमवारी भाविकांची गर्दी; धबधब्यावर पोलिसांचा बंदोबस्त
देवरूख, ता. १८ : सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या श्री क्षेत्र मार्लेश्वर येथे श्रावणातील पहिल्या सोमवारी भक्ती आणि निसर्गाचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. ‘मार्लेश्वर महाराजांच्या नावाने चांगभलं’ आणि ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने संपूर्ण मार्लेश्वर परिसर दुमदुमून गेला असतानाच पहाटेपासून दिवसभर स्वयंभू मार्लेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
पहाटेपासून मंदिर परिसरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. अधूनमधून पडणाऱ्या श्रावणसरी सह्याद्रीच्या उंचच उंच पर्वतरांगा, सर्वत्र पसरलेले धुके, हिरवाईने नटलेले डोंगर आणि उंच कड्यांवरून कोसळणारे धबधबे यामुळे मार्लेश्वरच्या सौंदर्यात आणखी भर पडली होती. निसर्गाचे हे विलोभनीय रूप अनुभवत भाविकांनी महादेवाचे दर्शन घेतले.
भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मंदिर परिसरात दर्शनासाठी शिस्तबद्ध रांगा लावल्या होत्या. भाविकांना कोणताही त्रास होऊ नये तसेच गर्दीचे नियोजन सुरळीत व्हावे यासाठी संबंधित यंत्रणांकडून आवश्यक व्यवस्था केली होती. श्रावणी सोमवारनिमित्त मोठ्या प्रमाणावर भाविक येणार असल्याने पोलिस प्रशासनाने सुरक्षेच्यादृष्टीने चोख बंदोबस्त ठेवला होता. मंदिर परिसरासह प्रमुख मार्गांवर पोलिसांची नियुक्ती केली होती. वाहनांची वाढती संख्या लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्थेवरही विशेष लक्ष देण्यात आले. गर्दीवर नियंत्रण ठेवतानाच भाविकांना सुरक्षितपणे दर्शन घेता यावे यासाठी पोलिस कर्मचारी दिवसभर कार्यरत होते. श्रावणी सोमवारनिमित्त मंदिरात विविध धार्मिक विधी, आरती आणि महापूजेचे आयोजन करण्यात आले. भाविकांनी बेलपत्र, फुले आणि विविध पूजासाहित्य अर्पण करून मार्लेश्वराचे दर्शन घेतले. मंदिर परिसरात सुरू असलेल्या धार्मिक विधींमुळे वातावरण अधिकच भक्तीमय झाले होते.
कोट
श्रावणी सोमवारनिमित्त दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक मार्लेश्वर येथे येतात. यंदाही पहाटेपासूनच भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तीमय झाला होता. पावसाळ्यातील हिरवाई, धबधबे आणि धुक्यामुळे मार्लेश्वरचे निसर्गसौंदर्य अधिक खुलून दिसत असल्याने भाविकांसोबत पर्यटकांचाही उत्साह वाढला आहे.
- रूपेश सावंत, मारळ, ग्रामस्थ
कोट
मार्लेश्वर मंदिरातील भक्तीमय वातावरण, सह्याद्रीच्या डोंगररांगा, धुक्याने वेढलेला परिसर आणि कोसळणारे धबधबे हा अनुभव अविस्मरणीय आहे. महादेवाचे दर्शन घेतल्यानंतर या निसर्गरम्य वातावरणात काही वेळ घालवणे हा खरोखरच वेगळा आनंद आहे. मार्लेश्वर हे धार्मिक स्थळाबरोबरच निसर्गप्रेमींसाठीही आकर्षणाचे केंद्र आहे.
- संजय घडशी, संगमेश्वर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.