कोकण

धगधगत्या होमकुंडासाठी प्रसिद्ध भडेतील ''श्री सोमेश्वर''

CD

श्रावण विशेष - लोगो
rat23p13.jpg
59145
लांजा ः भडे येथील सोमेश्वर मंदिरातील गाभारा.
rat23p14.jpg-
59146
भडे येथील शिवलिंग
-----------
धगधगत्या होमकुंडासाठी
प्रसिद्ध भडेतील ‘श्री सोमेश्वर’
प्राचीन वास्तूकलेचे देवस्थान ; पांडवकालीन मंदिर
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. २३ ः लांजा व रत्नागिरी तालुक्याच्या सीमेवर वसलेले, शिमगोत्सवातील धगधगत्या होमकुंडाच्या परंपरेसाठी प्रसिद्ध असलेले भडे गाव स्वयंभू व जागृत श्री सोमेश्वर देवाच्या कृपाछत्राखाली वसले आहे. पुरातन वास्तुकला आणि अद्वितीय धार्मिक परंपरा लाभलेले श्री सोमेश्वर मंदिर हे संपूर्ण परिसर आणि भाविकांचे मोठे श्रद्धास्थान आहे.
कातळशिल्पाचे गाव म्हणून ओळख असलेल्या भडे येथील सोमेश्वर मंदिराची अनेक ऐतिहासिक व पौराणिक वैशिष्ट्ये आहेत. या मंदिराची तटबंदी पांडवकालीन जांभ्या दगडाची असून गाभारा प्राचीन वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे. काळ्या दगडातील स्वयंभू शिवलिंग, सुमारे ५० फूट उंचीची षटकोनी आकाराची निशाणकाठी आणि मंदिराच्या एका बाजूला पूर्वापार वाहणारे पाटाचे पाणी हे या मंदिराचे मुख्य आकर्षण आहे.
कार्तिक पौर्णिमा, त्रिपुरारी पौर्णिमा तसेच महाशिवरात्रीला मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. महाशिवरात्रीला रात्रभर आरती, भजन, कीर्तन आणि पालखी सोहळा रंगतो. श्रावणात होम-हवन व विशेष पूजा केली जाते. सीमेवरील ‘बेनी’ गावाची भडे गावाशी पूर्वापार नाळ जोडलेली आहे. शिमग्यानंतर रामनवमी व दशमीच्या दिवशी बेनीची पालखी भडे गावातील ठराविक स्थळे घेऊन सोमेश्वर मंदिरात वस्तीला येते. ही भेट बहीण-भावाची भेट मानली जाते. हे जागृत देवस्थान आणि निसर्गरम्य वातावरणामुळे श्री सोमेश्वर मंदिरात वर्षभर भाविकांची मोठी वर्दळ पाहायला मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तरुणांच्या मुद्द्यावर CJP पुन्हा आक्रमक; केंद्राच्या आश्वासनांवर प्रश्नचिन्ह, आंदोलनाचा इशारा

लायब्ररीच्या वॉशरूममध्ये भिंतीला छिद्र, मोबाइल कॅमेरा लावून विद्यार्थिनींचे व्हिडिओ अन्...; मालकाच्या मुलाचं विकृत कृत्य

Dilip Walse Pati: अंगणवाडीच्या पोषण आहारावर गंभीर प्रश्न! दर्जाची निष्पक्ष चौकशी करा, दोषींवर कारवाई करा; वळसे-पाटील आक्रमक

Latur Crime: चाकूरमध्ये पहाटे महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावले; चाकूचा धाक दाखवत १ लाख ३० हजारांचा ऐवज लंपास

‘फुलों का तारों का…’ गाणं आठवतं? रक्षाबंधनाच्या दिवशी हमखास ऐकलं जातं, पण हे गाणं कोणी लिहिलं?

SCROLL FOR NEXT