rat७p५.jpg-
26O68329
राजापूर ः विशेष जनजागृती कार्यक्रमात मार्गदर्शन करताना मान्यवर. उपस्थित नगरसेवक दिलीप चव्हाण, प्रेरणा नार्वेकर आदी.
---
राजापूर हायस्कूलमध्ये
पोषण अभियान उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ७ ः राष्ट्रीय पोषण अभियान पंधरवड्याचे औचित्य साधून जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, एकात्मिक बालविकास योजना, जिल्हा बालसंरक्षण कक्ष व सखी वनस्टॉप सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने राजापूर हायस्कूलमध्ये ‘सेवासंकल्प अभियान’ अंतर्गत विशेष जनजागृती कार्यक्रम झाला.
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मनोज पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन नगरसेवक गोविंद चव्हाण, नगरसेविका प्रेरणा नार्वेकर आणि मुख्याध्यापक पोवार यांच्या हस्ते झाले. या वेळी सखी वन स्टॉप सेंटरच्या स्वरा मयेकर, चाईल्ड हेल्पलाइन प्रतिनिधी ऐश्वर्या लाड, ग्रामीण रुग्णालयाच्या डॉ. हर्षाली, मुख्य अंगणवाडी सेविका कल्पना आंबवले, अंगणवाडी सेविका व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
राजापूर ग्रामीण रुग्णालयाच्या डॉ. हर्षाली यांनी किशोरवयीन वयातील शारीरिक-मानसिक बदल आणि वैयक्तिक स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले. तर मुख्य सेविका कल्पना आंबवले यांनी सकस आहाराचे महत्त्व पटवून दिले. ‘मिशन शक्ती’अंतर्गत सखी वन स्टॉप सेंटर, सखी निवास, पाळणाघर योजना व महिला सक्षमीकरणाच्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती देण्यात आली. ‘मिशन वात्सल्य’ अंतर्गत १०९८ चाईल्ड हेल्पलाइन, बालहक्क, सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना, सुरक्षित-असुरक्षित स्पर्श आणि ‘पोक्सो’ कायद्याबाबत विद्यार्थिनींमध्ये प्रबोधन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शहरातील सर्व अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.