कोकण

खेडमध्ये दोन वर्षांत 900 हून अधिक वन्यजीवांची सुटका

CD

संकटातील ९०० वन्यजीवांना जीवदान


खेडमध्ये सर्परक्षक, प्राणिमित्रांच्या मदतीने बचाव

सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ८ ः वाढते शहरीकरण, जंगलालगतच्या मानवी वस्त्या आणि नैसर्गिक अधिवासावरील वाढता ताण यामुळे मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर वनविभागाने स्थानिक सर्परक्षक व प्राणिमित्रांच्या मदतीने गेल्या दोन वर्षांत ९००हून अधिक वन्यजीवांची सुरक्षित सुटका करून त्यांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात मुक्त केले आहे.
वनविभागाच्या नोंदीनुसार, मानवी वस्तीत शिरलेले तसेच विहिरी, घरे आणि शेतांमध्ये अडकलेल्या वन्यजीवांच्या बचावासाठी विविध मोहिमा राबवण्यात आल्या. यामध्ये नाग, घोणस, मण्यार, धामण, रूपसुंदरी आणि अजगर यांसह ७००हून अधिक सापांचा समावेश आहे. उघड्या विहिरीत पडलेल्या बिबट्यांची तसेच नागरी वस्तीजवळ आलेल्या मगरींचीही सुरक्षित सुटका करण्यात आली. तस्करांच्या तावडीत सापडलेले किंवा मार्ग भरकटलेले खवले मांजर ताब्यात घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
अपघातात जखमी झालेल्या गरूड, गिधाड आणि घुबडांवर प्रथमोपचार करून त्यांचे पुनर्वसन करण्यात आले. वन्यजीवांचे प्राण वाचवण्यासोबतच त्यांना पुन्हा त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यावर वनविभागाकडून भर दिला जात आहे.
---
उघड्या विहिरी धोकादायक
शहर आणि ग्रामीण भागातील उघड्या विहिरी वन्यजीवांसाठी धोकादायक ठरत आहेत. त्यामुळे अशा विहिरी बुजवणे किंवा वापरातील विहिरींना संरक्षक कठडे बसवणे आवश्यक आहे. वन्यजीव नागरीवस्तीत आढळल्यास नागरिकांनी घाबरून जाऊन त्याला इजा न करता तातडीने वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाना पाटेकर गेले, पण त्यांनी उभा केलेला ‘तो माणूस’ अजूनही जिवंत! राज ठाकरेंची भावूक पोस्ट

Navratri 2026: ११ ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सव सुरु; नऊ दिवसांच्या व्रतात काय करावे अन् काय टाळावे? जाणून घ्या नियम...

SIR voter list: देशातील 42 निवृत्त न्यायमूर्तींचं खुलं पत्र! SIR वरुन सुरु असलेल्या वादावर स्पष्ट केली भूमिका

Latest Marathi News Live Update: इंडिया आघाडीचे खासदार राजघाटावर

India Alliance Protest : 'देश हायजॅक केलाय, लोकशाहीची हत्या सुरूय'; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, आंदोलनासाठी 300 खासदार राजघाटावर

SCROLL FOR NEXT