कोकण

रत्नागिरीत दुर्गामाता दौड उपक्रमाला युवकांचा प्रतिसाद

CD

-rat१२p३९.jpg-
P26O69500
रत्नागिरी : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे मारुती मंदिर येथे दुर्गामाता दौडमध्ये सहभागी धारकरी.
---------
रत्नागिरीत दुर्गामाता दौडचा प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ : शहरातील मारुती मंदिर येथे उद्योजक संतोष तावडे यांच्या हस्ते ध्वजाला पुष्पहार अर्पण करून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे श्री दुर्गामाता दौडचा प्रारंभ करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे घटस्थापना ते विजयादशमी या कालावधीत ही दौड आयोजित केली असून, याला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
पहिल्या दिवशी दौड मारुती मंदिर, माळनाका, श्री व्याघ्रेश्वरी अंबामाता मंदिर, जैन नगर, एकता मार्ग, मारुती मंदिरमार्गे आयोजित केली. दररोज मारुती मंदिर येथून दौडला सुरुवात होणार आहे. १४ ऑक्टोबरला विश्वनगर मित्रमंडळ, १५ला आई माऊली मित्रमंडळ, सन्मित्रनगर, १६ला थिबापॅलेस रोड मित्रमंडळ आणि १७ला नवलाई देवी मंदिर, नाचणे येथील दुर्गामातेचे दर्शन घेण्यात येणार आहे. १८ला रविवारी तेलीआळी नाका येथून दौडला सुरवात होईल. या दिवशी झाडगावच्या श्री जोगेश्वरी देवीचे दर्शन आणि १९ ला जय भैरव नवरात्र मंडळ मांडवी आणि तेलीआळी मित्रमंडळाच्या देवीचे दर्शन घेतले जाईल. २०ला विजयादशमी असून, या दिवशी मारुती मंदिर येथून दुचाकीने रत्नदुर्ग किल्ल्यावरील जाऊन तिथून श्री देवी भगवतीचे दर्शन घेण्यात येणार आहे. यानंतर या दौडची सांगता होणार आहे. यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन जयदीप साळवी आणि वैभव पांचाळ यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gopichand Padalkar : सांगली जिल्हा बँक निवडणुकीत गोपीचंद पडळकरांना धक्का; उमेदवारी अर्ज अवैध, शक्तिप्रदर्शन करत दाखल केला होता अर्ज

Raju Shetti Protest : राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत पुणे-बंगळूर महामार्गावरील वाहतूक बंद, हजारो शेतकरी दाखल

दिल्लीत सहकाऱ्यांना पुन्हा ताब्यात घेतलं, दीपके कच्च्या रस्त्याने पोहोचले शेतात; आंदोलनाबाबत फोनवरून चर्चा

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर हत्या प्रकरणी माजी महापौरांच्या पतीची चौकशी सुरू

Manoj Jarange: “जरांगेनीच माझ्यावर हल्ल्यासाठी सुपारी दिली”; अमोल खुणेंचा गंभीर आरोप, म्हणाले, “आता सुट्टी देणार नाही”

SCROLL FOR NEXT