कोकण

रत्नागिरी-मिशन बंधारेतून 12 हजारांचे उद्दिष्ट

CD

जिल्ह्यात १२ हजार बंधाऱ्यांचे उद्दिष्ट
३०५ पूर्ण; लोकसहभागातून कामे सुरू
रत्नागिरी, ता. १२ ः जिल्ह्यात यंदा अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाल्याने संभाव्य पाणीटंचाईची चिंता वाढली आहे. उन्हाळ्यातील जलसंकटावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाने ‘मिशन बंधारे’ हाती घेतले असून, जिल्ह्यात १२ हजार बंधारे उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यापैकी आतापर्यंत ३०५ बंधाऱ्यांची उभारणी पूर्ण झाली आहे. उर्वरित बंधाऱ्यांची कामे लोकसहभागातून करण्यावर भर दिला जात आहे.
जिल्ह्यातील तीन तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला असून, अन्य तालुक्यांमध्येही पाणीटंचाईची शक्यता आहे. त्यासाठी विविध भागांत कच्चे, वनराई आणि विजय बंधारे उभारण्यात येत आहेत. या मोहिमेत ग्रामस्थ, विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी आणि राजकीय नेते श्रमदानातून सहभागी होत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात १६९ कच्चे, ४९ वनराई आणि ९३ विजय बंधारे असे एकूण ३०५ बंधारे पूर्ण झाले आहेत. यामध्ये चिपळूण तालुक्यात ६५, दापोलीत ४०, गुहागरमध्ये ७५, खेडमध्ये २०, लांजात ६०, मंडणगडमध्ये पाच, राजापूरमध्ये चार, रत्नागिरीत ३३ आणि संगमेश्वरमध्ये तीन बंधाऱ्यांचा समावेश आहे.
बंधाऱ्यांमुळे नद्या आणि नाल्यांमधून वाहून जाणारे पाणी अडवून साठा वाढवता येतो तसेच परिसरातील विहिरींची पाणीपातळी वाढण्यास मदत होते. परिणामी, उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी पाणी उपलब्ध होण्यास हातभार लागतो. संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी प्रशासनाकडून ‘मिशन बंधारे’ला गती दिली जात आहे.

चौकट
बंधाऱ्यांमुळे भूजलपातळीत वाढ
जिल्ह्यात यंदा पाऊस कमी झाल्याने वनराई बंधारे उभारण्याच्या कामांना गती देण्यात आली आहे. कृषी विभागाला १२ हजार बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले असून, आतापर्यंत ३०५ बंधारे पूर्ण झाले आहेत. या मोहिमेमुळे बंधाऱ्यांच्या परिसरातील विहिरींमधील पाणीसाठा वाढण्यास मदत होईल. त्यामुळे संभाव्य दुष्काळी परिस्थितीत पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी या बंधाऱ्यांचा उपयोग होईल, अशी माहिती कृषी सभापती महेश नाटेकर यांनी दिली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bus Fare Hike: बसमधून प्रवास करणे महागणार! प्रवासात खिसा रिकामा, मिरा-भाईंदर पालिकेचा बस भाडेवाढीचा प्रस्ताव

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे अजूनही सर्वोच्च न्यायालयात, इंडिया आघाडीचे नेतेही उपस्थित

निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडी आक्रमक, राहुल गांधींसह ११ नेत्यांनी दाखल केली याचिका, सुनावणी कधी?

Laptop Mobile Cleaning Tips: मोबाईल बाथरूमपासून बेडरूमपर्यंत कुठेही नेता? मग जंतूंचा संपर्क कमी करण्यासाठी स्वच्छतेच्या 'या' टिप्स वापराच

रेल्वे प्रवासात प्रवाशांची घुसमट, अपुऱ्या सुविधांमुळे दररोज गर्दीशी सामना; अतिरिक्त लोकलची मागणी

SCROLL FOR NEXT