rat१४p३१.jpg-
26O70050
रत्नागिरी : कोकणातले पहिले आयआयए फेलो आर्किटेक्ट संतोष तावडे यांचा सत्कार करताना आयआयए रत्नसिंधु सबसेंटरचे पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य.-
---
‘रत्नसिंधू’ कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा
अध्यक्षपदी केसरकर; संतोष तावडे यांचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १५ : भारतीय वास्तुविशारद संस्था (आयआयए) रत्नसिंधु रत्नागिरी-सिंधुदुर्ग सबसेंटरचा नूतन कार्यकारिणी पदग्रहण समारंभ विवा एक्झिक्युटीव्ह येथे झाला. यावेळी कोकणातले पहिले आयआयए फेलो म्हणून आर्किटेक्ट संतोष तावडे यांचा सत्कार करण्यात आला.
सबसेंटरच्या अध्यक्षपदी मकरंद केसरकर (रत्नागिरी), उपाध्यक्ष गौरी सामंत (वेंगुर्ला), कोषाध्यक्ष संजना शेटे (रत्नागिरी), सचिव श्रेया इंदुलकर (रत्नागिरी), सल्लागार आर्किटेक्ट संतोष तावडे, कार्यकारिणी सदस्य नीलेश गुंदेचा (रत्नागिरी), प्रियदर्शन कोपरकर (दापोली), अपूर्वा मोहिते (रत्नागिरी), हर्षद सरवणकर (रत्नागिरी), स्वीकृत सदस्य मेघा पंडित बारटक्के (दापोली), शलिन कापडी (संगमेश्वर) व इतर सदस्यांची फेरनियुक्ती झाली.
या समितीचा कार्यकाळ २०२६ ते २०२८ असा दोन वर्षांचा आहे. दोन वर्षांमध्ये विविध शैक्षणिक, सामाजिक उपक्रम राबवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. आर्किटेक्ट फॉर लाईफ या उपक्रमाअंतर्गत रविवारी (ता. १८) सकाळी १० वाजता लायन्स आयकेअर हॉस्पिटल, एमआयडीसी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.