- rat१६p१.jpg-
P26O70484
दापोली ः पूजा अशोक चव्हाण यांचा यशस्वी उद्योजक म्हणून सत्कार करताना श्रेया कदम, नगराध्यक्षा कृपा घाग. सोबत अशोक चव्हाण.
----
उद्योग-व्यवसायात महिलांची भरारी
श्रेया कदम ः दापोलीत ‘नवदुर्गा सन्मान’
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. १६ : ‘‘महिलांनी केवळ घरापुरते मर्यादित न राहता उद्योग, व्यवसाय आणि विविध क्षेत्रांत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. या सर्व महिला उद्योजिकांच्या पाठीशी मंत्री योगेश कदम आणि मी सातत्याने भक्कमपणे उभे राहू.’’ असे प्रतिपादन श्रेया कदम यांनी केले.
दापोली तालुका व्यापारी संघटनेच्या महिला विभागातर्फे आयोजित ‘नवदुर्गा सन्मान’ सोहळ्यात त्या बोलत होत्या. हा कार्यक्रम जालगाव येथील श्री प्रितीवर्धन मंगल कार्यालयात झाला. या वेळी दापोली तालुक्यातील विविध क्षेत्रांत आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या प्रणाली वालावलकर, पूजा चव्हाण, सारिका गुजराथी, नीलम जाधव, प्रणाली गुरव, माधुरी विचारे, समिधा मेहता, साक्षी बेंडल आणि डॉ. रश्मी जोशी या नवदुर्गांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व गौरवपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला. या वेळी नगराध्यक्ष कृपा घाग, पंचायत समिती उपसभापती नम्रता तोडणकर आणि जिल्हा परिषद सदस्य किशोर देसाई उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.