- ratchl१६३.jpg ः
26O70546
चिपळूण ः वाचकवीर पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव करताना मान्यवर.
स्वरा धावडे , तेजल चव्हाणचा
वाचकवीर पुरस्काराने गौरव
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १७ ः वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सहावी ‘ड’च्या विद्यार्थ्यांनी अभिनव ‘वर्ग ग्रंथालय’ उपक्रम सुरू केला आहे. वर्षभरात सर्वाधिक आणि विविध विषयांवरील पुस्तकांचे वाचन करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रदान करण्यात येणारा ‘वाचकवीर’ पुरस्कार स्वरा धावडे आणि तेजल चव्हाण यांना देण्यात आला.
विद्यार्थ्यांनी स्वतःच्या संग्रहातील कथा, कविता, बोधकथा, विज्ञानकथा आणि थोर व्यक्तींची चरित्रे अशी ७८ हून अधिक पुस्तके एकत्र करून वर्गातच ग्रंथालय साकारले. या ग्रंथालयाचे व्यवस्थापन आणि पुस्तकांची देवाणघेवाण करण्यासाठी विद्यार्थ्यांमधूनच ‘बाल ग्रंथपाल’ निवडण्यात आला. विद्यार्थ्यांनी विविध पुस्तकांचे वाचन केले, तसेच डॉ. कलाम यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग कथन केले. डिजिटल युगातही पुस्तकांचे महत्त्व कायम असून, डॉ. कलाम यांना आदरांजली वाहण्याचा वाचन हा उत्तम मार्ग असल्याचे ग्रंथपाल अनुष्का काजोलकर यांनी सांगितले. या कल्पक उपक्रमाचे प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण, पर्यवेक्षक महेश कुलकर्णी, शिक्षक आणि पालकांनी कौतुक केले.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.