कोकण

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दिग्गजांची कोंडी

CD

- rat१६p३५.jpg-
26O70585
जिल्हा बँक

जिल्हा बँकेत इच्छुकांची धाकधूक वाढली
दहा वर्षांच्या संचालकांना पात्रतेचा पेच; नव्यांना संधी शक्य
मुझ्झफर खान ः सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १६ : रत्नागिरी जिल्हा बँकेच्या सत्तेची गणिते यंदा बदलण्याची चिन्हे असून, प्रस्थापित संचालकांसमोर उमेदवारीचे आव्हान उभे राहिले आहे. दहा वर्षांचा संचालकपदाचा कार्यकाळ, उमेदवारीच्या पात्रतेवरून निर्माण झालेला कायदेशीर पेच आणि महायुतीकडून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची रणनीती यामुळे सहकार क्षेत्रातील दिग्गजांची कोंडी झाली आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीकडून कार्यकर्त्यांना संधी देण्याचे सूत्र पुढे आल्याची चर्चा आहे. ठाणे आणि रत्नागिरी जिल्हा बँकांमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या भूमिकेमुळे इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. उमेदवारांची निवड, जागावाटप आणि राजकीय समीकरणे निश्चित करताना पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांचे नेतृत्व महत्त्वाचे ठरण्याची शक्यता आहे. जिल्हा बँकेत आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. यंदा निवडणुकीत महायुतीकडून कोणाला संधी दिली जाते आणि जुन्या संचालकांबाबत कोणती भूमिका घेतली जाते, यावर निवडणुकीचे चित्र अवलंबून असेल. अनुभवी संचालकांना पुन्हा संधी देताना नव्या कार्यकर्त्यांना सामावून घेण्याचे आव्हान महायुतीसमोर असणार आहे. संचालकांच्या पात्रतेबाबतचा संभ्रम आणि राजकीय पक्षांमधील संभाव्य समझोता यामुळे काही जागांवर नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते. जागावाटपावर एकमत झाल्यास काही ठिकाणी बिनविरोध निवडीचे चित्रही निर्माण होण्याची शक्यता आहे; मात्र, अंतिम निर्णय उमेदवारांची पात्रता, न्यायालयीन आदेश आणि राजकीय पक्षांच्या भूमिकांवर अवलंबून असेल. प्रारूप मतदार यादीवर आक्षेप नोंदवण्याची अंतिम मुदत १३ ऑक्टोबर २०२६ रोजी संपली आहे. आता २६ ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर निवडणुकीच्या पुढील प्रक्रियेला वेग येण्याची अपेक्षा आहे. संचालकांच्या पात्रतेचा पेच, महायुतीची रणनीती आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचे सूत्र यामुळे यंदाच्या जिल्हा बँक निवडणुकीकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
जिल्हा बँकेच्या विद्यमान संचालक मंडळात दहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या संचालकांची संख्या सुमारे दहा आहे. यामध्ये अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव, आमदार शेखर निकम, राजेश सुर्वे, रमेश दळवी, गजानन पाटील, दीपक पटवर्धन, जयंत जाळगावकर, माजी मंत्री रवींद्र माने यांच्या पत्नी नेहा माने आणि सुधीर काळेकर यांचा समावेश आहे. त्यामुळे या संचालकांच्या उमेदवारीबाबत लागू असलेल्या नियमांचा नेमका परिणाम काय होणार, हा महत्त्वाचा प्रश्न बनला आहे.
---
कोट
रत्नागिरी जिल्हा बॅंक आम्ही डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे चालवली, याहीपुढे बॅंकेची प्रगती होईल. आम्ही नेहमीच नवीन सदस्यांना प्राधान्य दिले आहे, यापुढेही देऊ. न्यायालयीन आदेश आल्यानंतर पुढील निर्णय घेतले जातील. सध्या केवळ चर्चाच सुरू आहेत.

- बाबाजी जाधव, उपाध्यक्ष रत्नागिरी जिल्हा बॅंक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Protest Controversy : "सीजेपीच्या आंदोलनामागे अमेरिकन अब्जाधीश इलॉन मस्कचा हात!"; भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांचा खळबळजनक आरोप

Delhi Protest High Drama : 'तिरंगा मार्च' सुरू होण्यापूर्वी अवघ्या १० मिनिटे आधी मोठी कारवाई! सीजेपी प्रमुख अभिजीत दिपकेंना दिल्ली पोलिसांकडून पुन्हा ताब्यात

Marathi News Live Updates: तिरंगा मोर्चापूर्वीच अभिजीत दिपके आणि नेहा बोरा पोलिसांच्या ताब्यात; कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी

YUZVENDRA CHAHAL: लग्न तुटल्यानंतर चहलला पॅनिक अटॅक, दारूचं व्यसनही जडलं! २६ दिवस रिहॅबमध्ये काय घडलं?

ना श्रीराम ना माधुरी; 'ही' आहे धकधक गर्लच्या घराची नेमप्लेट, फराह खानसुद्धा झाली अवाक

SCROLL FOR NEXT