कोकण

व्हेल माशाच्या उलटीची तस्करी:आरोपीस अटक; पाच कोटींचा माल जप्त

सकाळ वृत्तसेवा

माणगाव : व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीत मुंबई (Mumbai)पोलिस दलातील बडतर्फ कर्मचाऱ्याला झालेल्या अटकेची घटना ताजी असतानाच, ६ जुलै रोजी माणगाव (Mangaon)तालुक्यातील लोणेरे (Lonere) येथे रायगडच्या (Raigad)स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने रत्नागिरी येथून मोटारसायकलवर व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या एकास जेरबंद केले. अब्दुल मुसालिब मोहम्मद जाफर सुर्वे (वय ४५, रा. खेड, रत्नागिरी) असे संशयित आरोपीचे नाव असून त्याच्याकडून पाच किलो वजनाची अंदाजे पाच कोटी रुपये किमतीच्या उलटीसह मोटारसायकल पोलिसांनी हस्तगत केली आहे. (whale-fish-vomit-smuggling-kokan-crime-marathi-news)

रत्नागिरी येथून एक जण व्हेल माशाच्या उलटीच्या विक्रीसाठी रायगडात येणार असल्याची माहिती रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिस अधीक्षक अशोक दुधे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख पोलिस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक महेश कदम यांनी संशयिताला ताब्यात घेतले. यासंबंधी गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, अधिक तपास पोलिस करीत आहेत. व्हेल माशाच्या उलटीचा वापर अतिउच्च प्रतीचा परफ्युम, काही औषधांमध्ये, तर काही ठिकाणी सिगारेट, मद्य तसेच, खाद्यपदार्थांमध्ये स्वाद वाढविण्यासाठी केला जातो. याची खरेदी-विक्री हे वन्यप्राणी सुरक्षा अधिनियमांतर्गत बेकायदेशीर आहे.

भारतीय बाजारपेठेत या उलटीची किंमत पाच कोटी रुपये आहे; तर आंतरराष्ट्रीय पातळीवर अंदाजे वीस कोटी रुपये किंमत असल्याचे बोलले जाते. दुर्मिळ असलेल्या व्हेल माशाने खोल समुद्रात केलेली उलटी कालांतराने दगडासारखी बनते. यामध्ये आम्ब्रिन, म्ब्रोक्झिन, म्ब्रोनॉल ही रसायने असतात.

- महेश कदम, पोलिस उपनिरीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; स्थानिक प्रशासनाकडून बचावकार्य सुरू

Pune Accident: पुण्यात धक्कादायक घटना! वडाचे झाड अंगावर कोसळून दोन महिला जखमी; प्रकार CCTV मध्ये कैद

Satara News: माण तालुक्यात धक्कादायक प्रकार; एफडीएच्या भीतीने दूध रस्त्यावर ओतल्याने भेसळीच्या चर्चांना उधाण

Latest Marathi News Live Update : देशातील सर्वात मोठे ऍग्रो कन्वेंशन सेंटर नागपुरात - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Solapur: पत्नीच्या भांडणाला व तिच्या प्रियकराच्या त्रासाला कंटाळून एका 26 वर्षीय युवकाने राहत्या घरी घेतला गळफास मोहोळ तालुक्यातील यावली येथील घटना

SCROLL FOR NEXT