schools esakal
कोकण

सिंधुदुर्ग जिल्ह्यात १२७ शाळा दुरुस्त होणार

निधी उपलब्ध; पावणेदोन वर्षांनी दुसरा हप्ता

सकाळ वृत्तसेवा

ओरोस : समग्र शिक्षा अभियान अंतर्गत मंजूर असलेल्या १२७ शाळांच्या शाळा दुरुस्ती निधी अभावी रखडल्या होत्या. शासनाने तब्बल पावणेदोन वर्षांनी दुसऱ्या हप्त्याचा निधी उपलब्ध करून दिल्याने या शाळांचा दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.

समग्र शिक्षा अभियानांतर्गत अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यातील मोठ्या दुरुस्त्या आवश्यक असलेल्या १२९ शाळांना दुरुस्तीसाठी २०२०-२१ मध्ये मंजुरी देण्यात आली होती. यातील दोन शाळांची दुरुस्ती अन्य योजनेतून झाल्याने त्या रद्द केल्या होत्या. उर्वरित १२७ शाळांच्या दुरुस्तीला मान्यता देण्यात आली होती. यामुळे जिल्ह्यातील शाळा दुरुस्तीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागला होता. त्यामुळे निधीअभावी दुरुस्त न होऊ शकलेल्या शाळांचा यात मोठ्या प्रमाणात समावेश झाला होता. यासाठी एकूण ४ कोटी २३ लाख ६७ हजार ५०० रुपये एवढा निधी मंजूर होता. यातील दोन कोटी ६५ लाख २० हजार रुपये एवढा निधी प्राप्त झाला होता. तो निधी ऑक्टोबर २०२० मध्ये वितरीत केला होता. त्या निधीतून शाळा दुरुस्तीची कामे सुरू झाली. बहुतांश दुरुस्तीचे काम पूर्ण झाले होते. मात्र, त्यानंतर शासनाकडून निधी प्राप्तच झाला नव्हता. त्यामुळे ठेकेदार अडचणीत आले होते.

प्राथमिक शिक्षण विभागाकडून वारंवार यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत होता; परंतु निधी प्राप्त होत नव्हता. अखेर शासनाने नुकताच उर्वरित निधी प्राप्त करून दिला आहे. एक कोटी ५८ लाख ४७ हजार ५०० रुपये एवढा निधी प्राप्त करून दिला आहे. यामुळे रखडलेली दुरुस्ती पूर्णत्वाकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

एवढा निधी वितरित

१२७ शाळा दुरुस्ती मंजूर होती. पहिल्या हप्त्यात दोन कोटी ६५ लाख २० हजार रुपये एवढा निधी प्राप्त झाला होता. यातील पाच लाख रुपयांच्या वरील दुरुस्ती असलेल्या शाळांना ५० टक्के निधी वितरित करण्यात आला होता. तर पाच लाखांच्या खालील दुरुस्ती असलेल्या शाळांना ७५ टक्के निधी देण्यात आला होता. दुरुस्तीच्या एकूण मूल्यांकनाच्या आधारे ही रक्कम देण्यात आली होती.

पाच टक्के शिल्लक ठेवणार

समग्र शिक्षा अभियानाच्या सहाय्यक उपक्रम अधिकारी स्मिता नलावडे यांना विचारले असता, ‘शिल्लक एक कोटी ५८ लाख ४७ हजार ५०० रुपये एवढा निधी दुसऱ्या हप्त्यात प्राप्त झाला आहे. यातून ज्यांची ५० टक्के रक्कम शिल्लक आहे. त्यांना ४५ टक्के निधी देणार. तर २५ टक्के शिल्लक निधीतील २० टक्के देण्यात येणार आहे. शाळा दुरुस्तीचे १०० टक्के काम पूर्ण झाल्यावर उर्वरित पाच टक्के निधी वितरित करू.’

दुसरा हप्ता थकल्याने शाळा व्यवस्थापन समिती व ठेकेदारांकडून झालेल्या कामांच्या पैशांची मागणी करण्यात येत होती; मात्र, शासनाकडून निधी प्राप्त झाला नसल्याने बिले करता येत नव्हती. दुसरा हप्ता थकला तरी शाळा दुरुस्तीची कामे पूर्णत्वास गेली आहेत. काही किरकोळ कामे शिल्लक आहेत. त्यामुळे आता निधी प्राप्त झाल्याने ही कामे तत्काळ पूर्ण होतील.

- महेश धोत्रे, प्राथमिक शिक्षणाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संविधानात बसेल ते मिळेल, कुणाच्या ताटातलं देणार नाही; मराठा आरक्षणावर फडणवीसांची प्रतिक्रिया, जरांगे म्हणाले, ताटच उरणार नाही

सभ्य रहा, नीट कपडे परिधान करा! भाडेकरू मुलींना घरमालकाचा सल्ला, रूममध्ये लावला CCTV कॅमेरा

Marathi News Live Updates : सरकारने आवश्यक ते निर्णय घेतलेत, शिष्टमंडळ जरांगेंकडे जाणार नाही : विखे-पाटील

Pithori Amavasya 2026: १० की ११ सप्टेंबर? पिठोरी अमावस्या नक्की कधी? जाणून घ्या तिथी, पूजेची पद्धत अन् महत्त्व!

Sainik Takli MIDC protest : सैनिक टाकळी एमआयडीसीविरोधात शिरोळमध्ये राडा; प्रशासनाच्या कार्यालयाचे गेट तोडले, काचा फोडल्या, पोलिस कर्मचारी जखमी

SCROLL FOR NEXT