Pakistani athletes participate in the Paris  sakal
क्रीडा

Paris Olympics 2024 Opening Ceremony : पाकिस्तानचं हम सात सात है! भारताचे त्यांच्यापेक्षा ११० अधिक खेळाडू ऑलिम्पिकसाठी ठरलेत पात्र

Paris Olympics 2024 Opening Ceremony India Time - चार वर्षांच्या मेहनतीचं फळ मिळवण्याची वेळ आता आली आहे... क्रीडा विश्वाचा सर्वात मोठा महोत्सव आजपासून सुरू होत आहे आणि भारताचे ११७ खेळाडू तिरंगा डौलाने फडकवण्यासाठी सर्वस्व पणाला लावताना दिसणार आहेत...

Swadesh Ghanekar

Paris 2024 Olympics Opening Ceremony India - संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात पार पडला.. ऑलिम्पिक स्पर्धा इतिहासात प्रथमच उद्घाटन सोहळा स्टेडियममध्ये पार न पडता नदीच्या तीरावर झाला... खुल्या आसमंतात सीन नदीच्या तीरावर हा भव्यदिव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात १४० कोटी भारतीयांच्या नजरा शोधत होत्या त्या आपल्या ११७ खेळाडूंना.... पण, भारताच्या तुलनेत यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत पाकिस्तानचे पात्र ठरणाऱ्या खेळाडूंची संख्या फार कमी आहे. त्यांच्यापेक्षा बर्म्युडा, लिबेरीया, अलबानिया या देशांचे खेळाडू अधिक पात्र ठरले आहेत.

पी व्ही सिंधू आणि शरथ कमल हे अनुभवी यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे ध्वजवाहक होते आणि त्यांच्या हातातला तिरंगा डौलाने फडकलेला पाहून भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून आला. ''उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणे हा अत्यंत सन्मान आहे. सर्व क्रीडापटू येथे येण्यास उत्सुक आहेत, विशेषत: जे प्रथमच ऑलिम्पिक खेळणार आहेत. मी कधीही यापूर्वी उद्घाटन समारंभांना हजेरी लावली नाही, कारण आमच्या स्पर्धा दुसऱ्या दिवशी असायच्या. पण, मी आता फक्त खेळाडूंना हेच सांगतोय की हा क्षण जगा आणि त्याचा आनंद घ्या,''भारताचे चीफ दी मिशन गगन नारंग यांनी सांगितले.

शेजाऱ्यांचे फक्त ७ शिलेदार....

२६ जुलै ते ११ ऑगस्ट या कालावधीत पार पडणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत पाकिस्तानच्या केवळ ७ खेळाडूंना पात्रता मिळवता आली आहे. फईका रियाज ( १०० मी.), अर्शद नदीम ( भालाफेक), गुल्फान जोसेफ ( १० मी. एअर पिस्तुल), घुलाम मुस्ताफा बशीर ( २५ मी. रॅपिड फायर पिस्तुल ), किश्मला तलात ( महिला १० मी. एअर पिस्तुल व २५ मी. पिस्तुल), मुहम्मद अहमद दुरानी ( २०० मी. फ्री स्टाईल) जेहनारा नबी ( २०० मी. फ्री स्टाईल) हे पाकिस्तानी खेळाडू यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झाले आहेत. पाकिस्तानला ऑलिम्पिक स्पर्धा इतिहासात ३ सुवर्ण, ३ रौप्य व ४ कांस्य असे एकूण १० पदकं जिंकता आली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT