Sanju Samson  esakal
क्रीडा

Sanju Samson : तुला नंतर लक्षात येईल त्यामुळे... संजूला माजी क्रिकेटपटूने दिला मोलाचा सल्ला

अनिरुद्ध संकपाळ

Sanju Samson : बीसीसीआय ज्यावेळी संघाची घोषणा करते त्या त्यावेळी संजू सॅमसन हमखास सोशल मीडियावर ट्रेंड करत असतो. संजू सॅमसन संघात असवा असे प्रत्येक क्रिकेटप्रमीला वाटत असते. मात्र संजू सॅमसनला संधी मिळाल्यावर तो त्या संधीचा पुरेपूर फायदा उचलत नाहीये.

वनडे मालिकेत एक अर्धशतक ठोकले होते. मात्र वेस्ट इंडीज विरूद्धच्या टी 20 मालिकेत त्याला लौकिकास साजेसा असा खेळ करता आलेला नाही. सॅमसनने दोन टी 20 सामन्यात फक्त 19 धावा केल्या आहेत.

त्याला तिसऱ्या टी 20 सामन्यात फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. आता त्यांच्याकडे स्वतःला सिद्ध करण्यासाठी दोनच सामने आहेत. त्यामुळे माजी खेळाडू आकाश चोप्राने संजूला एक मोलाचा सल्ला दिला आहे.

बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापन वनडे वर्ल्डकपसाठीचा संघ तयार करत आहेत. संघासाठी खेळाडूंची चाचपणी अंतिम टप्प्यात आली आहे. अशा परिस्थितीत संजू सॅमसनला आपली उपयुक्तता सिद्ध करून दाखवावी लागणार आहे. त्याने वेस्ट इंडीज विरूद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात 41 चेंडूत 51 धावांची खेळी केली होती.

मात्र टी 20 मालिकेत त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. याबाबत आकाश चोप्रा आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाला की, 'संजू सॅमसन तू मिळालेली संधी दवडू नकोस. जर तू संधी वाया घालवलीस तर त्याचा तुला नंतर पश्चाताप होईल. इशान किशन जागा पटकावेल आणि संजू बाहेर जाईल असं नाही तर दोघंही जातील अन् जितेश शर्मा त्यांची जागा घेऊ शकतो.'

सूर्यकुमार यादवने तिसऱ्या टी 20 सामन्यात 44 चेंडूत 83 धावा चोपून काढत संजूचे टेन्शन वाढवले. वनडे वर्ल्डकप संघात संजू आणि सूर्या मधल्या फळीतील जागेसाठी एकमेकांचे स्पर्धक आहेत. सूर्याची वनडे कामगिरी तितकी चांगली नाही. मात्र त्याने टी 20 मध्ये चांगली कामगिरी करत आहे.

संजू सॅमसन हा वनडेमध्ये भारताचा विकेटकिपर म्हणून तिसरी पसंती आहे. संघ व्यवस्थापन केएल राहुलला पहिली पसंती देणार आहे. तो सध्या संघात पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. इशान किशनने देखील आपली वनडे संघातील जागा पक्की केली आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT