Suryakumar Yadav Ab de Villiers  esakal
क्रीडा

Suryakumar Yadav : सूर्यकुमासमोर मोठं आव्हान! डिव्हिलियर्सने दिला मोलाचा सल्ला

अनिरुद्ध संकपाळ

Suryakumar Yadav Ab de Villiers : भारताचा 360 डिग्री खेळाडू म्हणून नावारूपाला येणाऱ्या सूर्यकुमार यादवची चर्चा अचानक थंड झाली आहे. आयपीएलमध्ये चांगल्या धावा करणाऱ्या सूर्यकुमारला त्याचे भारताच्या कसोटी संघातील स्थान गमवावे लागले आहे. सूर्यकुमार यादव मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आपल्या वैविध्यपूर्ण फटकेबाजीने सामन्याचा नूर एकहाती पालटतो. मात्र त्याच्या कामगिरीत सातत्य नसते.

याबाबतच दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्स जिओ सिनेमाशी बोलताना म्हणाला की, 'त्याच्यासमोर कामगिरीत सातत्य राखण्याचे खूप मोठे आव्हान आहे. त्याला कसोटी क्रिकेटमध्ये कसं खेळायचं हे निश्चित करावं लागले. वनडे आणि टी 20 मध्ये देखील कोणती गोष्ट त्याच्यासाठी योग्य आहे हे ठरवावे लागेल. मला वाटते की मी जे काही म्हणतोय त्याची त्याला जाणीव आता झालेली आहे.'

डिव्हिलियर्स पुढे म्हणाला की, 'मी कधी जे फटके मारले नाहीत ते फटके सूर्यकुमार मारतोय हे खूप भारी आहे. तो ज्यावेळी फटकेबाजी सुरू करतो त्यावेळी त्याला पाहणे खूप चांगले वाटते. मला वाटते त्याला अजून खूप पल्ला गाठायचा आहे. तो अजून चांगली कामगिरी करू शकतो. तो भविष्यात यापेक्षाही चांगला क्रिकेटपटू होऊ शकतो. याबाबत मी खूप उत्सुकता आहे.

सूर्यकुमारने 48 टी 20 सामने खेळले आहेत. त्यात त्याने 46.52 च्या सरासरीने 1675 धावा केल्या. त्याचे स्ट्राईक रेट 175.76 इतके जबरदस्त आहेत. त्याने टी 20 मध्ये तीन शतके आणि 13 अर्धशतके ठोकली आहेत. मात्र त्याला वनडेमध्ये अशी कामगिरी करणे जमलेले नाही. तो 23 वनडे खेळला असून त्याला फक्त एक कसोटी सामना खेळायला मिळाला आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAKISTAN SEMIS SCENARIOS : न्यूझीलंड हरला, म्हणून पाकड्यांनी जास्त फडफडू नये! उपांत्य फेरीचं समीकरण पाहताच येईल चक्कर...

T20 WC, NZ vs ENG : इंग्लंडने बाजी मारली, पाकिस्तानच्या जीवात जीव आला! न्यूझीलंड पराभूत होऊनही पोहचू शकतात उपांत्य फेरीत

Reliance Group: अंबानींच्या सून राधिका मर्चंट पैठणमध्ये! तीन महिन्यात दुसरा दौरा; पोलिस बंदोबस्तात प्रकल्पाला दिली भेट

Accident : सिंदखेड फाट्यावर दुचाकी चारचाकीची भीषण धडक; एक महिला ठार, एक जखमी

Mount Abu Name Change : जगप्रसिद्ध 'माउंट अबू'सह तीन शहरांचे नामांतर; मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT