क्रीडा

विमानातून पडून अफगाणिस्तानच्या फूटबॉलपटूचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

काबुल विमानतळावर 16 ऑगस्टला उड्डाण करणाऱ्या एका विमानाला लटकून काहींनी प्रवास करण्याचा प्रयत्न केला होता.

काबुल - अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या भीतीने नागरिक देश सोडत आहेत. काबुल विमानतळावर 16 ऑगस्टला उड्डाण करणाऱ्या एका विमानाला लटकून काहींनी प्रवास करण्याचा प्रयत्न केला होता. त्यातून पडल्यानं तिघांचा मृत्यू झाला होता. आता विमानातून पडून अफगाणिस्तानच्या फूटबॉलपटू जाकी अनवारी याचा मृत्यू झाला आहे. काबुल विमानतळावर अमेरिकेच्या विमानातून पडल्यानं अनवारीचा मृत्यू झाला.

एरियाना या अफगाण वृत्तसंस्थेनं सांगितलं की, काबुलवर तालिबानने ताबा मिळवल्यानंतर 16 ऑगस्टला विमानतळावर अनेक लोक पोहोचले होते. त्यामध्ये जाकी अनवारी याचाही समावेश होता. तेव्हा झालेल्या गोंधळामध्ये उड्डाण करणाऱ्या सी 17 या विमानावर अनवारी चढला होता. मात्र विमानातून पडून त्याचा मृत्यू झाला. अनवारीचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती क्रीडा महासंचालनालयाने दिली असल्याचं एरियानाने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

अफगाणिस्तानच्या फुटबॉल संघाने फेसबुक पेजवरून जाकी अनवारी याच्या मृत्यूनंतर श्रद्धांजली वाहिली आहे. त्यानंतरच अनवारीचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. फेसबुकवर जाकी अनवारी याचा फोटो शेअर करताना सांगण्यात आलं की, विमानातून पडून त्याचा मृत्यू झाला आहे. जाकी अनवारी हा अफागणिस्तानच्या राष्ट्रीय युवा फुटबॉल संघाचा खेळाडू होता.

तालिबानने 15 ऑगस्टला काबुलसह अफगाणिस्तानवर ताबा मिळवला. त्यानंतर देशात असुरक्षित वातावरण तयार झाल्यानं नागरिक इतर देशांमध्ये जात आहेत. 16 ऑगस्टला काबुल विमानतळावरून सर्व कमर्शिअल विमान उड्डाणे बंद करण्यात आली. तसंच देशातून बाहेर जाण्यासाठी काबुल विमानतळ हाच एक मार्ग आहे. त्यामुळे नागरिकांनी विमानतळावर मोठी गर्दी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

Rahul Narwekar : अलिबागमध्ये नेमकं काय घडलं होतं? राहुल नार्वेकरांनी सांगितला घटनाक्रम; संजय राऊतांनाही दिलं आव्हान

Beed News : बीडमध्ये ‘लेडी बाऊन्सर्स’ची एन्ट्री; बिल्डरभोवती महिला सुरक्षेची कडेकोट फौज! जमिनीच्या वादानंतर घेतला अनोखा निर्णय

SCROLL FOR NEXT