Igor Stimac India Football Team Head Coach esakal
क्रीडा

Igor Stimac : भारतीय फुटबॉल फेडरेशननं कोच इगोर स्टिमॅक यांची 'या' कारणामुळं केली उचलबांगडी

अनिरुद्ध संकपाळ

Igor Stimac India Football Team Head Coach : अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनने भारतीय वरिष्ठ पुरूष फुटबॉल संघाचे प्रमुख प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांची पदावरून उचलबांगडी केली आहे. भारताला फिफा वर्ल्डकप 2026 च्या पात्रता फेरीतील तिसऱ्या राऊंडसाठी पात्र होता आलं नाही. यानंतर एआयएफएफने हा निर्णय घेतला.

भारताचा कतारविरूद्धच्या शेवटच्या सामन्यात 2 - 1 असा पराभव झाला होता. त्यामुळे ग्रुप स्टेजमध्ये भारताला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं होतं. याचबरोबर भारताचा स्टार फुटबॉलपटू सुनिल छेत्रीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतल्यानंतर हा आठवड्याभरात घेण्यात आलेला निर्णय आहे.

एआयएफएफ प्रसिद्ध केलेल्या आपल्या अधिकृत वक्तव्यात म्हणते की, 'एआयएफएफचे उपाध्यक्ष एनए हारिस यांच्या नेतृत्वाखाली एक बैठक झाली. फिफा वर्ल्डकप 2026 च्या पात्रता फेरीत वरिष्ठ पुरूष संघाच्या निराशाजनक कामगिरीनंतर या बैठकीत एकमताने संघासाठी आता नवा हेड कोच निवडण्याची वेळ आली आहे असा निर्णय झाला.

ही बैठकीनं प्रभारी सचिव सत्यनारायण यांना बैठकीतील निर्णय हेड कोच इगोर स्टिमॅक यांना कळवण्यात यावा असं सांगितलं आहे. त्यांना कोच पदाच्या कार्यभारातून तात्काळ प्रभावाने मुक्त करण्यात आलं आहे. एआयएफएफ इगोर यांनी भारतीय फुटबॉलसाठी दिलेल्या सेवाबद्दल त्यांचे आभार मानते. तसेच भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा देते.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२४ साक्षीदार, ५० सुनावण्या… अखेर न्याय मिळाला! डोंगराळेतील चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा!

‘दार उघडलं की, वाट बघणारं कोणी नसतं’ रेशम टिपणीस यांचा एकटेपणावर भाष्य करणारा Video Viral, म्हणाल्या... 'आयुष्यात आता कोणीतरी हवंय'

Devendra Jain Viral Video : तुम्ही गाढव, मी ग्रॅज्युएट... भाजप आमदाराला तरुणाचे प्रत्युत्तर, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल, नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates: सर्वोच्च न्यायालयात राहुल गांधींवरील महिला पत्रकाराच्या आरोपांप्रकरणी २६ किंवा २७ ऑक्टोबरला सुनावणी

Ladki Bahin Yojana September Installment : लाडक्या बहिणींचा सप्टेंबरचा हप्ता कधी येणार? दिवाळीपूर्वी खात्यात 3,000 रुपये जमा होणार का? जाणून घ्या मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT