ashes 2023 eng vs aus Batting Without Brains England Great geoffrey boycott  SAKAL
क्रीडा

Ashes 2023 : 'डोकं नसल्यासारखं फलंदाजी...' माजी खेळाडू इंग्लंडवर जाम भडकले

Kiran Mahanavar

Ashes 2023 Eng vs Aus : अॅशेस मालिकेतील 2023 चा दुसरा कसोटी सामना लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर खेळला जात आहे. तीन दिवसांच्या खेळानंतर ऑस्ट्रेलिया संघ पूर्णपणे इंग्लिश संघावर वर्चस्व गाजवताना दिसत आहे. तिसऱ्या दिवशी इंग्लिश फलंदाजांनी आपल्या विकेट्स कांगारू गोलंदाजांना एक हाती भेट म्हणून दिल्या.

इंग्लंडच्या 278 धावांवर चार विकेट होत्या. पण पुढील काही षटकात संपूर्ण संघ 325 धावा करून ऑल आऊट झाला. यावर माजी कर्णधार जेफ्री बॉयकॉट इंग्लंडवर जाम भडकले. 46 धावांत सहा विकेट गमावणाऱ्या इंग्लंड संघाच्या फलंदाजांची ही कामगिरी त्यांना आवडली नाही. बॉयकॉटने इंग्लिश फलंदाजांना चांगलीच क्लास घेतली.

अॅशेस मालिकेत इंग्लंड संघाचा बेसबॉल दृष्टिकोन पाहता संघाचे पारडे जड असल्याचे दिसून आले आहे, पण लवकर धावा करण्याच्या नादात इंग्लिश फलंदाज ठराविक अंतराने विकेट गमावत आहेत.

संघाच्या फलंदाजांची ही कामगिरी पाहून जेफ्री बॉयकॉट कपाळावर हात लावला, ज्याचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. बॉयकॉटने तो फोटो कॅप्शनसह शेअर केला "ही डोकं नसल्यासारखं फलंदाजी करत आहे. मी माझ्या कर्णधार माईक ब्रेअरलीशी बोलत आहे.

माजी इंग्लिश कर्णधार टेलीग्रामवर लिहिले की, इंग्लंड नेहमी आक्रमण फलंदाजी करू इच्छितात. जर तुम्ही असेच खेळत राहिलात तुमचा अहंकार वाढेल, म्हणूनच तुम्ही पोप आणि डॅकन यांनी त्यांच्या विकेट गमावल्या. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडच्या अहंकारासोबत खेळ सुरू ठेवला. हुक शॉटमुळे इंग्लंडने पूर्णपणे दडपून टाकलेल्या अवस्थेत ऑस्ट्रेलियाच्या संघाला सामन्यात पुनरागमन करता आले. इंग्लंड एका क्षणी अव्वल स्थानावर होते, पण त्यांनी नंतर सहज शरणागती पत्करली.

इंग्लंडचा बेसबॉलचा जबरदस्त दृष्टिकोन?

इंग्लंडचा बेसबॉल दृष्टीकोन आतापर्यंत 2023 च्या अॅशेस मालिकेवर ड्रॅग करणारा ठरला आहे. पहिल्या कसोटीत डाव घोषित करण्याचा कर्णधार बेन स्टोक्सचा निर्णय हे संघाच्या पराभवाचे प्रमुख कारण ठरले, तर लॉर्ड्स कसोटीच्या धावपळीत संघाची फलंदाजीची क्रमवारी पत्त्यासारखी कोसळली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Crime : महाविद्यालयीन तरुणांच्या टोळक्याचा कोल्हापुरात उन्माद २५ हून अधिक वाहने फोडली; तलवारी, एडके घेऊन केली दहशत

CM Gram Sadak Yojana: मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय! ग्रामीण रस्त्यांसाठी ६,४२९ कोटींचा निधी; मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी

Monsoon Update : मान्सून पुन्हा लांबणीवर...महाराष्ट्रात नेमका कधी दाखल होणार? मॉन्सूनची प्रगती का रखडली? जाणून घ्या

Farmer Loan Waiver: कर्जमाफीवर शिक्कामोर्तब! ५५ लाख शेतकऱ्यांना ३६,५८५ कोटींचा मिळणार लाभ; मात्र काय आहेत योजनेचे प्रमुख निकष-अटी

खान सर यांच्या कोचिंग सेंटरबाहेर गोळीबार, ८ ते १० राउंड फायर; सुरक्षा रक्षक जखमी, कुणी केला हल्ला?

SCROLL FOR NEXT