Ashes 2023 Moeen Ali  
क्रीडा

Moeen Ali: कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर मोईन अलीने केले पुनरागमन! संघात झाली अचानक एंट्री

Kiran Mahanavar

Ashes 2023 Moeen Ali : इंग्लंडचा स्टार क्रिकेटपटू मोईन अलीने अॅशेसमध्ये खेळण्यासाठी कसोटी निवृत्तीनंतर परतण्याचा निर्णय घेतला आहे. हा स्टार अष्टपैलू खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अॅशेस मालिकेसाठी इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. फिरकी गोलंदाज जॅक लीचच्या जागी मोईन अलीला संघात संधी देण्यात आली आहे. जॅक लीच दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. आयर्लंड क्रिकेट संघाविरुद्ध खेळल्या गेलेल्या एकमेव कसोटीदरम्यान तो जखमी झाला होता.

जॅक लीचच्या दुखापतीमुळे इंग्लंड क्रिकेट बोर्ड महेंद्रसिंग धोनीचा आवडता अष्टपैलू खेळाडू मोईन अलीला संघात सामील करू इच्छित आहे. त्यासाठी त्याच्याशी बोलणीही सुरू असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मोईन अलीने कर्णधार बेन स्टोक्स आणि प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांच्याशी बोलून परतण्याचा निर्णय घेतला.

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने अॅशेसच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी मोईन अलीचा संघात समावेश केला आहे. संघाचे व्यवस्थापकीय संचालक रॉब की म्हणाले, 'आम्ही या आठवड्यात मोईन अलीशी त्याच्या पुनरागमनाबद्दल बोललो. त्याने थोडा वेळ घेतला आणि मग निर्णय घेतला. मोईन पुन्हा कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी खूप उत्सुक आहे. त्याचा अनुभव आणि अष्टपैलू प्रतिभा अॅशेस मालिकेत कामी येईल. आम्ही मोईनला शुभेच्छा देतो.

36 वर्षीय मोईन अलीने इंग्लंडकडून 64 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात त्याच्या नावावर 2,914 धावा आणि 195 विकेट आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 11 कसोटी सामन्यांमध्ये या खेळाडूने 25.05 च्या सरासरीने 20 विकेट आणि 476 धावा केल्या आहेत. त्याने 2021 साली भारताविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. मोईन अलीच्या आगमनाने इंग्लंडच्या फलंदाजीत आणखीनच भर पडेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT