Ben Stokes Ashes Series Controversy esakal
क्रीडा

Ben Stokes Ashes Series : ऑस्ट्रेलियाच्या माध्यमांनी केली टिंगल टवाळी; स्टोक्सने चूक दाखवत पिक्चरच पाडला

अनिरुद्ध संकपाळ

Ben Stokes Ashes Series : अॅशेस मालिकेतील लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने यजमान इंग्लंडला 43 धावांनी पराभूत केलं. ऑस्ट्रेलियाने या विजयाबरोबरच मालिकेत 2 - 0 अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान, दुसऱ्या कसोटीच्या शेवटच्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा विकेटकिपर एलेक्स कॅरीने जॉनी बेअरस्टोला वादग्रस्तरित्या धावबाद केले.

यानंतर इंग्लंडमधील माध्यमांनी ऑस्ट्रेलियन संघावर जहरी टीका केली. याला प्रत्युत्तर म्हणून ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सला रडणारं बाळ (Crybabies) असं म्हणत त्याची टिंगल - टवाळी केली.

द वेस्ट ऑस्ट्रेलियन वर्तमानपत्राने बेन स्टोक्सचे छोट्या बाळाच्या रूपातील फोटो शेअर करून त्याला रडणारं बाळ असं कॅप्शन दिलं होते. याला बेन स्टोक्सने ट्विट करून प्रतिक्रिया दिली. स्टोक्सने आपल्या प्रतिक्रियेत वर्तमानपत्राने केलेल्या एका चुकीकडे लक्ष वेधत टीकाकारांच्या टिंगल टवाळीतील हवाच काढून टाकली.

स्टोक्स आपल्या ट्विटमध्ये म्हणतो की, 'हा नक्कीच मी नाही, मी कधी नवीन चेंडूवर गोलंदाजी केली नाही.'

स्टोक्सने जॉनी बेअरस्टोच्या वादग्रस्त धावबाद प्रकरणावर देखील आपले मत व्यक्त केले. त्याने ऑस्ट्रेलियन टीमने जे केले ते योग्य की अयोग्य हे न सांगता मी जिंकण्यासाठी असली कृती केली नसती असे म्हणत अप्रत्यक्षरित्या पॅट कमिन्सला टोला लगावला.

कमिन्सने पत्रकार परिषदेवेळी विकेटकिपर एलेक्स कॅरीच्या कृत्याचे समर्थन केले. 'तुम्ही बघाल तर जॉनी हे कायम करत आला आहे. त्याने डेव्हिड वॉर्नरविरूद्ध केलं होतं. त्याने 2019 मध्ये स्टीव्ह स्मिथबाबत देखील असंच केलं होतं.'

'ज्यावेळी फलंदाज क्रिजच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करायला लागला तर सहसा विकेटकिपर असं करतात. कॅरीला याचं संपूर्ण श्रेय जातं. त्याला संधी मिळाली. जॉनीने यापूर्वीही क्रिज सोडली होती. बाकी तुम्ही सर्व पंचांवर सोडा.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM 1st T20I: गौतम गंभीर भारतीय संघासोबत झिम्बाब्वेत का नाही? मुख्य प्रशिक्षक मग कोण? BCCI ने घेतला निर्णय

Anna Hazare: विद्यार्थ्यांसाठी मूक आंदोलन पुकारलं; अण्णा हजारेंना रडू कोसळलं, भावनिक व्हिडिओ व्हायरल, कारण काय?

Mumbai Pollution: पृथ्वीला प्रदूषणाचा विळखा, पीओपी बंदीचे समर्थन; याचिकाकर्त्यांचा न्यायालयात युक्तिवाद

Latest Marathi Update : मुसळधार पावसामुळे मक्कासार गावात पूरसदृश परिस्थिती निर्माण

Indigenous Rice Aambegaon: आंबेगावात दुर्मिळ देशी भात वाण संवर्धनासाठी लागवड प्रात्यक्षिक; शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

SCROLL FOR NEXT