Asia Cup 2023 Opening Ceremony esakal
क्रीडा

Asia Cup 2023 : कपाळावर टिकली अन् हातात बांगड्या... पारंपरिक पेहरावात त्रिशलाने गाजवला Opening Ceremony

अनिरुद्ध संकपाळ

Asia Cup 2023 Opening Ceremony : आशिया कपमधील पहिला पाकिस्तान विरूद्ध नेपाळ सामना आजपासून सुरू झाला आहे. या सामन्यापूर्वी पाकिस्तानातील मुल्तान येथे छोटेखानी उद्घाटन सोहळा देखील झाला. या सोहळ्यात नेपाळची प्रसिद्ध गायिका त्रिशला गुरूंगने आपल्या आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध केले. यानंतर आतषबाजीने आशिया कपच्या सुरूवात झाली.

यंदाचा आशिया कप हा पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन देशात होणार आहे. आशिया कपचा पहिला सामना हा मुल्तान येथे यजमान पाकिस्तान आणि पहिल्यांदाच आशिया कप खेळणाऱ्या नेपाळ यांच्यात होत आहे. या सामन्यापूर्वी आशिया कपचा उद्घाटन सोहळा देखील पार पडला.

यावेळी ऐमा बेग आणि नेपाळची गायिका त्रिशला गुरूंगने आपली कला सादर केली. यानंतर नाणेफेक झाली. यजमान पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुल्तानच्या खेळपट्टीबद्दल बालोयचं झालं तर खेळपट्टी थोडी कोरडी आहे.

आशिया कपमधील हा पहिला सामना असला तरी स्टेडियममध्ये चाहत्यांनी मात्र फारशी गर्दी केली नव्हती. नाणेफेक जिंकून प्रथम फंलदाजी करणाऱ्या पाकिस्तानला नवख्या नेपाळने पहिल्या सहा षटकातच दोन धक्के दिले. करण केसीने फखर जमानला 14 धावांवर बाद केले. तर रोहित पौडेलने इमाम - उल - हकला 5 धावांवर धावबाद केले.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT