babar azam big statement After defeating Nepal 
क्रीडा

Ind vs Pak : 'भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी आमच्या संघाला...' सामना जिंकल्यानंतर कर्णधार बाबरचे मोठे वक्तव्य

Kiran Mahanavar

India vs Pakistan : आशिया कप 2023 ची सुरुवात पाकिस्तानने विजयाने केली. कर्णधार बाबर आझम आणि इफ्तिखार अहमद यांची शतके आणि दोघांमध्ये पाचव्या विकेटसाठी 131 चेंडूत 214 धावांची विक्रमी भागीदारी. यानंतर गोलंदाजांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर पाकिस्तानने नेपाळचा 238 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला.

पाकिस्तानच्या मोठ्या विजयानंतर कर्णधार बाबर आझमने खेळाडूंचे कौतुक केले आणि भारताविरुद्धच्या सामन्यावरही मोठे वक्तव्य केले.

सामन्यानंतर बाबर म्हणाला, आशिया कप स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात नेपाळवर 238 धावांनी विजय मिळविल्याने शनिवारी कट्टर प्रतिस्पर्धी भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी आमच्या संघाला आत्मविश्वास मिळाला. आम्हाला प्रत्येक सामन्यात 100 टक्के द्यायचे आहे, आशा आहे की आम्ही तिथेही असेच करू.

बाबर पुढे म्हणाला, 'जेव्हा मी क्रीजवर आलो तेव्हा मला काही चेंडूंची टेस्ट घ्यायची होती. कारण चेंडू वेगाने बॅटीवर येत नव्हता. मी रिझवानसोबत भागीदारी केली आणि त्याचा सामन्यावर परिणाम झाला. मी आणि रिजवान दोघेही एकमेकांना प्रोत्साहन देते होतो. इफ्तिखार आल्यानंतर परिस्थिती बदलली. त्याने खूप चांगली फलंदाजी केली. दोन-तीन चौकार मारल्यानंतर तो लयीत आला. या कामगिरीवर मी समाधानी आहे. वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटूंनी त्यांचे काम चोख बजावले.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने सहा गड्यांच्या मोबदल्यात 342 धावांची मोठी धावसंख्या उभारली. बाबर आझमने 131 चेंडूत 14 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 151 धावा केल्या. तर इफ्तिखारने 71 चेंडूत नाबाद 11 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 109 धावा केल्या. इफ्तिखारचे हे पहिले एकदिवसीय शतक होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT