Asian Games 2023 esakal
क्रीडा

Asian Games : स्विचऑफ मोबाईल हरवला, 10,000 आसन क्षमतेचं स्टेडियम पिंजून काढलं... अखेर स्वयंसेवकांनी करून दाखवलं

अनिरुद्ध संकपाळ

Asian Games 2023 : विचार करा तुमचा मोबाईल हरवला आहे आणि तो 10,000 आसन क्षमता असलेल्या मैदानात हरवला आहे. त्यात तो फोन जर स्विच ऑफ असेल तर तो शोधणं जवळपास अशक्यच आहे. मात्र चीनमधील हांगझू येथे सुरू असलेल्या एशियन गेम्सदरम्यान, स्टेडियममध्ये हरवलेला मोबाईल शोधून काढण्याचं मिशन इम्पॉसिबलवालं काम हे मैदानातील स्वयंसेवकांनी केलं आहे.

हाँग काँगच्या एका महिला खेळाडूचा फोन हा हांगझू येथील स्टेडियमवर गहाळ झाला होता. त्यात तो स्विच ऑफ असल्याने अडचणीत अजूनच वाढ झाली होती. हा मोबाईल शोधणं म्हणजे एक दिव्यच होतं. तो सापडण्याची शक्यता देखील अत्यंत कमीच होती.

मात्र स्टेडियममधील स्वयंसेवकांनी हे अश्यक्यप्राय काम करून दाखवलं. त्यांनी 523000 स्क्वेअर मीटर स्टेडियम पिंजून काढलं. त्यांनी जवळपास 10 हजार कचऱ्याच्या बॅग्ज रात्रभर उलथ्या पालथ्या केल्या. अखेर त्यांनी लियू तिआन यीचा मोबाईल शोधून काढलाच. हा फोन एका कचऱ्याच्या बॅगमध्ये मिळाला. हा एक चमत्कारच होता.

हांगझू एशियन गेम्सच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून याबाबतची माहिती देण्यात आली. अधिकाऱ्यांनी ट्विट केले की, 'मोहीम फत्ते 523000 स्क्वेअर मीटरचा आवार, 10000 आसन क्षमता असलेलं मैदान पिंजून काढत मोबईल शोधणं अशक्य होतं. मात्र हांगझू एशियन गेम्सने हे शक्य करून दाखवलं.'

'स्वयंसेवकांच्या एका गटाने दहा हजारापेक्षा जास्त कचऱ्याच्या बॅग्स एका रात्रीत तपासल्या. त्यामुळेच हाँग-काँगच्या 12 वर्षाच्या लियू तिआन यी या बुद्धीबळपटूचा हरवलेला मोबाईल सापडला. ही सर्व मोहीम 24 तासात फत्ते करण्यात आली.'

हांगझू एशियन गेम्सची सुरूवात 23 सप्टेंबरपासून एका अद्भुत उद्घाटन सोहळ्याने झाली. यात लाईट शो आणि डीजिटल टच रिलेचा देखील समावेश होता. चीनचे अध्यक्ष जिंगपिंग यांनी एशियन गेम्स सुरू झाल्याची घोषणा केली. जवळपास 45 देशातील 12000 खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा 8 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Dipke Arrest Claim : आज रात्री आम्हाला अटक होणार... अभिजीत दिपके यांचा मोठा दावा; तिसरी चूक करु नका, सरकारला थेट इशारा

Google Privacy Settings : तुमच्या प्रत्येक हालचालीवर गुगलची नजर? आत्ताच बंद करा 'या' 4 सेटिंग; नाहीतर ट्रॅक होत राहील डेटा

Latest Marathi News Live Update : दिल्लीत हाय अलर्ट! सर्व पोलिस कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द, अधिकाऱ्यांना सतर्कतेचे आदेश

Gujarat-Assam Flood Crisis : गुजरात अन् आसामवर आभाळ फाटलं; मुसळधार पावसामुळे पूर, जनजीवन विस्कळीत.. 872 गावे पाण्याखाली

Palghar Rain: पालघर जिल्ह्यात पावसाचे थैमान, २००हून अधिक गावांचा संपर्क तुटला; जनजीवन विस्कळीत

SCROLL FOR NEXT