क्रीडा

Asian Games 2023:भारताच्या खिशात आणखी दोन पदकं फिक्स, पुरुष आणि महिला स्क्वॉश संघ सेमी फायनलमध्ये दाखल

भारताच्या पुरुष आणि महिला स्कॉश संघाने भारतासाठी आणखी दोन पदकं निश्चित केले आहेत.

Manoj Bhalerao

Asian Games 2023:सध्या हँगझाऊ या ठिकाणी २०२३च्या आशियाई क्रीडा स्पर्धा खेळवल्या जात आहेत. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंकडून चांगलं प्रदर्शन करण्यात येतय. भारत पदकांच्या बाबतीत पाचव्या स्थानावर असून आतापर्यंत या स्पर्धेत २४ पदकांची कमाई केली आहे. ज्यामध्ये ६ सुवर्ण, ८ रौप्य आणि १० कांस्य पदाकांचा समावेश आहे. मात्र, भारताच्या खात्यात आणखी पदकं येण्याची शक्यता आहे. भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी सेमी फायनलमध्ये धडक मारत भारतासाठी दोन पदकं निश्चित केली आहेत.

भारताच्या पुरुष आणि महिला स्क्वॉश संघांनी गुरुवारी सेमी फायनलमध्ये धडक मारली. पुरुष संघाने नेपाळला ३-०ने धूळ चारत आपली सेमी फायनलची जागा निश्चित केली. पुरुष आणि महिला संघांनी आपल्या पूलमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. त्यामुळे या दोन्ही संघाचं कांस्य पदक तर निश्चितच झालय.

भारताने आतापर्यंत २०२३च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ६ सुवर्ण पदकं जिंकली आहेत. भारताला आणखी सुवर्णपदकं मिळू शकतात. यामध्ये कबड्डी, बॅडमिंटन ,अ‍ॅथलेटिक्स या क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. यावेळी नीरज चोप्रावर विशेष लक्ष असणार आहे. त्याच्याकडून देखील देशवासीयांना सुवर्ण पदकाची अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi on Paper Leak: 'पेपरफुटी करणाऱ्यांची आता खैर नाही'; PM मोदींची मोठी घोषणा, कठोर कायदा आणणार; व्हिडिओ संदेशात नेमकं काय सांगितलं?

Government talks CJP : सोनम वांगचुकनी उपोषण सोडल्यानंतर मोठी घडामोड! कॉकरोच जनता पार्टीसोबत सरकार चर्चेला तयार, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय होणार?

Latest Marathi News Live Update : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर आंदोलनाचं काय होणार? CJP चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी स्पष्टच सांगितलं

Spinach Cheese Sweet Corn Mini Paratha: मुलांच्या डब्यासाठी बेस्ट! पालक-चीज-स्वीट कॉर्नचे मिनी पराठे एकदा नक्की ट्राय करा

सोनम वांगचुक यांनी 26 दिवसांनी उपोषण सोडलं, दिल्लीत मध्यरात्री घडामोडी; जेपी नड्डांनी रुग्णालयात भेट घेतल्यानंतर निर्णय

SCROLL FOR NEXT