Asian Games 2023 Neha Thakur wins silver in sailing 
क्रीडा

Asian Games 2023 : भारताच्या खात्यात आणखी एक पदक, नेहा ठाकूरने नौकानयन स्पर्धेत जिंकले रौप्यपदक

Kiran Mahanavar

Neha Thakur Won Silver Medal : आशियाई क्रीडा 2023 मध्ये भारताच्या खात्यात आणखी एक पदक जमा झाले आहे. यावेळी नेहा ठाकूरने महिलांच्या नौकानयन स्पर्धेत रौप्य पदक पटकावले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी भारताचे हे पहिले पदक आहे. भारताने आतापर्यंत एकूण १२ पदके जिंकले आहेत. दुसऱ्या दिवसअखेर भारतीय संघाने 2 सुवर्णांसह 11 पदके जिंकली होती. तिसऱ्या दिवशीही भारतीय खेळाडूंकडून अनेक पदकांची अपेक्षा आहे.

तुलिका मान ज्युदोमध्ये कांस्यपदकाच्या लढतीत पोहोचली असून येथे विजय मिळवून ती कांस्यपदक जिंकू शकते. तुलिका मानने तिची रिपेचेज फेरी चायनीज तैपेईच्या जिया वेन त्साय विरुद्ध इप्पॉनने जिंकली आणि महिलांच्या +78 किलो गटात कांस्यपदकाच्या सामन्यात प्रवेश केला.

तर हॉकीमध्ये भारतीय पुरुष संघाने सिंगापूरविरुद्ध मोठा विजय नोंदवला आहे. आतापर्यंत पुरुष हॉकी संघ खूप चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी गट टप्प्यातील दुसऱ्या सामन्यात सिंगापूरचा 16-1 असा पराभव केला. या सामन्यात भारताकडून कर्णधार हरमनप्रीत सिंगने चार गोल केले. ग्रुप स्टेजच्या पहिल्या सामन्यात भारताने उझबेकिस्तानचा 16-0 असा पराभव केला होता. भारतीय हॉकी संघाने गट टप्प्यातील दोन सामन्यांमध्ये एकूण 32 गोल केले आहेत. भारताचा पुढचा सामना जपानशी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Dipke Arrest Claim : आज रात्री आम्हाला अटक होणार... अभिजीत दिपके यांचा मोठा दावा; तिसरी चूक करु नका, सरकारला थेट इशारा

Google Privacy Settings : तुमच्या प्रत्येक हालचालीवर गुगलची नजर? आत्ताच बंद करा 'या' 4 सेटिंग; नाहीतर ट्रॅक होत राहील डेटा

Latest Marathi News Live Update : दिल्लीत हाय अलर्ट! सर्व पोलिस कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द, अधिकाऱ्यांना सतर्कतेचे आदेश

Gujarat-Assam Flood Crisis : गुजरात अन् आसामवर आभाळ फाटलं; मुसळधार पावसामुळे पूर, जनजीवन विस्कळीत.. 872 गावे पाण्याखाली

Palghar Rain: पालघर जिल्ह्यात पावसाचे थैमान, २००हून अधिक गावांचा संपर्क तुटला; जनजीवन विस्कळीत

SCROLL FOR NEXT