Australia vs West Indies Test Series sakal
क्रीडा

AUS vs WI : कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा! 'या' स्टार खेळाडूची अचानक ताफ्यात एन्ट्री

Australia vs West Indies Test Series News|

Kiran Mahanavar

Australia vs West Indies Test Series : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या तिसऱ्या हंगामात ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ आपली पुढील मालिका वेस्ट इंडिजविरुद्ध घरच्या भूमीवर खेळणार आहे. जिथे 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळल्यानंतर ती तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा करताना ऑस्ट्रेलियानेही एकदिवसीय मालिकेसाठी संघ जाहीर केला. नियमित कर्णधार पॅट कमिन्सला विश्रांती दिली आणि स्टीव्ह स्मिथकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली.

अलीकडेच पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानविरुद्धच्या 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत क्लीन स्वीप केला. वेस्ट इंडिजविरुद्ध जाहीर झालेल्या संघात सलामीवीर मॅट रेनशॉचे पुनरागमन झाले आहे. याशिवाय कांगारू संघात इतर कोणतेही मोठे बदल दिसले नाहीत. दोन्ही संघांमधील मालिकेतील पहिला सामना 17 जानेवारीपासून अॅडलेड ओव्हलवर खेळला जाणार आहे.

पाकिस्तानविरुद्धची तीन सामन्यांची कसोटी मालिका संपल्यानंतर डेव्हिड वॉर्नरनेही या फॉरमॅटचा निरोप घेतला. आता कांगारू संघ कोणत्या खेळाडूवर उस्मान ख्वाजासोबत डावाची सलामी देण्याची जबाबदारी सोपवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सध्या या पदासाठी कॅमेरून ग्रीनचे नाव आघाडीवर आहे, जो आतापर्यंत संघात अष्टपैलू खेळाडूच्या भूमिकेत दिसला आहे. असे असूनही, निवडकर्त्यांनी या मालिकेसाठी डावखुरा फलंदाज मॅट रेनशॉचा देखील समावेश केला आहे, ज्याने आतापर्यंत 14 कसोटी सामने खेळले आहेत आणि 29.32 च्या सरासरीने 645 धावा केल्या आहेत.

पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या आवृत्तीचे विजेतेपद पटकावणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाने या आवृत्तीत आतापर्यंत शानदार खेळ केला आहे, ज्यामध्ये पाकिस्तानविरुद्धची कसोटी मालिका जिंकून ते थेट पहिल्या स्थानावर पोहोचले आहेत. सध्या संघ 56.25 गुणांच्या टक्केवारीसह प्रथम स्थानावर आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघ - ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, मॅट रेनशॉ, कॅमेरॉन ग्रीन, मिचेल मार्श, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, जोश हेझलवूड, नॅथन लियॉन, मिचेल स्टार्क.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT