ICC Women's WC Sakal
क्रीडा

ICC Women's WC: ऑस्ट्रेलियाची वॉर्नला 'विजयी श्रद्धांजली'

इंग्लंडविरुद्ध सामना जिंकून ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने शेन वॉर्नला खरी श्रद्धांजली वाहीली आहे.

दत्ता लवांडे

न्युझीलंड : शेन वॉर्नच्या (Shane Warne) आकाली निधनाने आख्ख्या क्रिकेट जगताला धक्का बसला आहे. त्यातच त्याला श्रद्धांजली म्हणून ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने विश्वचषकाच्या स्पर्धेत दंडावर काळ्या फिती बांधून सामना खेळला. त्याचबरोबर इंग्लंडविरुद्ध सामना जिंकून ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने शेन वॉर्नला खरी श्रद्धांजली वाहीली आहे. (ICC Women's ODI WC Updates)

दरम्यान न्युझीलंडमध्ये सुरु असलेल्या महिला विश्वचषकाच्या स्पर्धेत आज ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन बलाढ्य संघादरम्यान सामना रंगला. दरम्यान इंग्लंड संघाने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या संघाने ३ बाद ३१० धावापर्यंत मजल मारली. यामध्ये आर हेन्स (Rachael Haynes) हीने एक षटकार आणि चौदा चौकारासह १३१ चेंडूत तब्बल १३० धावा आणि लॅनिंग हीने ११० चेंडूत सात चौकार आणि एका षटकारासह ८६ रन केले. या दोघींच्या जोरावर ऑस्ट्रेलियाच्या संघाने ३ बाद ३१० धावा बनवल्या. दरम्यान इंग्लंडच्या स्किव्हर हीने २ विकेट घेतल्या.

ऑस्ट्रेलियाच्या या धावसंख्येचा पाठलाग करताना इंग्लंडच्या संघाने २९८ धावा केल्या. त्यामध्ये २ विकेट घेणाऱ्या स्किव्हरने तेरा चौकारासह ८५ चेंडूत तब्बल १०९ धावा केल्या. त्याचबरोबर टॅमी ब्यूमॉन्ट हीने सात चौकारासह ८२ चेंडूत ७४ धावा केल्या. इंग्लंडच्या संघातील तीन खेळाडू एकेरी धावसंख्येवर बाद झाले आणि एक खेळाडू शून्यावर बाद झाला. त्यामुळे इंग्लंड हा संघ ३१० पैकी २९८ धावा करु शकला.

या सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा संघ दंडावर काळ्या फिती बांधून मैदानावर उतरल्याचं पाहायला मिळालं. शेन वॉर्न या ऑस्ट्रेलियाच्या फिरकीपटूचं वयाच्या अवघ्या ५२ व्या वर्षी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने सगळ्यांनाच हदरा बसला आहे. त्याला श्रद्धांजली वाहण्यसाठी या सामन्यात महिला खेळाडूंनी काळ्या फिती दंडावर बांधल्या होत्या. तसेच हा सामना १२ धावांनी जिंकून श्रद्धांजली वाहीली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Booking Updates: ग्राहकांसाठी मोठा दिलासा! जुनी सुविधा पुन्हा सुरू... आता बुकिंग कसं बदललं ते जाणून घ्या

Thane Hospital: हेलीपॅड, एअर अ‍ॅम्ब्युलन्स, ९०० बेड अन्...; ठाण्यातील नवे हॉस्पिटल गेमचेंजर ठरणार, कोणत्या सुविधा मिळणार?

Andaman Sea tragedy : अंदमान समुद्रात भीषण दुर्घटना; २५० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती, मानव तस्करीचा उलगडा

Abhishek Sharma Axar Patel Dope Test : अभिषेक शर्मा, अक्षर पटेल 'नाडा' च्या रडारवर; आता कुठे जाता हे सांगावं लागेल... नाहीतर...

Gen Z Fashion Trends 2026: आउटडेटेड झालेल्या वायर इअरफोनच्या प्रेमात Gen Z, फॅशनमध्ये का परतला रेट्रो टच?

SCROLL FOR NEXT