क्रीडा

ऑस्ट्रेलियाचा मालिका विजय ; अखेरच्या लढतीत भारतीय संघावर मात

अखेरच्या लढतीत यजमान भारतीय संघावर ७ विकेट व ८ चेंडू राखून विजय मिळवला आणि तीन सामन्यांची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली. याआधी ऑस्ट्रेलियन संघाने एकदिवसीय मालिकेत ३-० असे यश मिळवले होते.

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघावर एकदिवसीयनंतर टी-२० मालिका गमावण्याची आपत्तीही ओढवली. ऑस्ट्रेलियन संघाने येथे झालेल्या अखेरच्या लढतीत यजमान भारतीय संघावर ७ विकेट व ८ चेंडू राखून विजय मिळवला आणि तीन सामन्यांची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली. याआधी ऑस्ट्रेलियन संघाने एकदिवसीय मालिकेत ३-० असे यश मिळवले होते.

भारताकडून ऑस्ट्रेलियासमोर १४८ धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते; पण कर्णधार एलिसा हिला व बेथ मुनी या सलामी जोडीने भारताच्या आशांवर पाणी फेरले. दोघींनी पहिल्या विकेटसाठी ८५ धावांची भागीदारी करताना भारतीय गोलंदाजांचे आव्हान लीलया परतवून लावले. हिलीने ३८ चेंडूंत ९ चौकार व १ षटकारासह ५५ धावांची खेळी केली. मुनी हिने ४५ चेंडूंमध्ये ५ चौकारांसह नाबाद ५२ धावांची खेळी करताना ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

दरम्यान, याआधी स्मृती मानधना व शेफाली वर्मा या जोडीने ३९ धावांची भागीदारी केली. मेगन शूटच्या गोलंदाजीवर शेफाली २६ धावांवर बाद झाली. त्यानंतर ६० ते ६६ या धावसंख्येदरम्यान भारताने तीन महत्त्वाचे फलंदाज गमावले आणि तिथेच धावसंख्येला ब्रेक लागला. ॲनाबेल सदरलँडने जेमिमाला २ धावांवर, जॉर्जिया वेअरहॅमने स्मृतीला २९ धावांवर आणि पुन्हा सदरलँडने हरमनप्रीत कौरला ३ धावांवर बाद करीत भारताला बॅकफूटवर नेले.

भारतीय संघ ४ बाद ६६ धावा अशा संकटात सापडला असताना रिचा घोष हिने तळाच्या फलंदाजांना सोबत घेऊन भारताला सावरले. रिचा घोष हिने २८ चेंडूंमध्ये २ चौकार व ३ षटकारांसह ३४ धावांची खेळी साकारली.

संक्षिप्त धावफलक ः भारत २० षटकांत ६ बाद १४७ धावा (स्मृती मानधना २९, रिचा घोष ३४, ॲनाबेल सदरलँड २/१२) पराभूत वि. ऑस्ट्रेलिया १८.४ षटकांत ३ बाद १४९ धावा (एलिसा हिली ५५, बेथ मुनी नाबाद ५२).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT