World Athletics Championships Avinash Sable 
क्रीडा

बीडच्या अविनाश साबळेची World Championships मध्ये भरारी, अंतिम फेरीत मारणार बाजी?

अविनाश साबळे आणि मुरली श्रीशंकर या भारतीय स्टार खेळाडूंनी जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये अंतिम फेरीत धडक मारली आहे.

Kiran Mahanavar

World Athletics Championships Avinash Sable : बीडच्या गावखेड्यातील धाव पट्टू अविनाश साबळे यांनी पुन्हा एकदा अटकेपार झेंडा फडकवला आहे. अविनाश साबळे आणि मुरली श्रीशंकर या भारतीय स्टार खेळाडूंनी जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये अंतिम फेरीत धडक मारली आहे.

अविनाश 3,000 मीटर स्टीपलचेजच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. त्याने त्याच्या हीटमध्ये 8 मिनिटे 18.75 सेकंद वेळ नोंदवत तिसरे स्थान पटकावले. या 27 वर्षीय खेळाडूच्या नावावरही राष्ट्रीय विक्रम आहे. जूनमध्येच त्याने डायमंड लीगमध्ये 8 मिनिटे 12.48 सेकंद अशी वेळ नोंदवून विक्रम केला होता.

श्रीशंकरने त्याचवेळी पुरुषांच्या लांब उडीत अंतिम फेरी गाठली आहे. प्रियांका गोस्वामीने महिलांच्या 20 किमी शर्यतीच्या चालण्याच्या अंतिम फेरीत 34 वे स्थान पटकावले, तर संदीप कुमार पुरुषांच्या 40 व्या स्थानावर राहिला.

अविनाश व्यतिरिक्त नीरज चोप्रा देखील जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताची सर्वात मोठी आशा आहे. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरजही यावेळी उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. गेल्या महिन्यात नीरजने स्टॉकहोम डायमंड लीगमध्ये 89.94 मीटर फेक करून राष्ट्रीय विक्रम मोडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT