Babar Azam Vs PCB esakal
क्रीडा

Babar Azam Vs PCB : कर्णधारपद सोडताच बाबरनं पीसीबीला घेतलं अंगावर; कायदेशी कारवाईचा विचार

अनिरुद्ध संकपाळ

Babar Azam Vs PCB : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा आणि बाबर आझम यांच्यातील वादाने आता वेगळे वळण घेतले आहे. नुकतेच बाबर आझमने पाकिस्तानचे सर्व फॉरमॅटमधील कॅप्टन्सी सोडली आहे. त्यानंतर आता तो त्याचे प्रायव्हेट व्हॉट्सअॅप चॅट लीक केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाईचा विचार करत आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी हे वैयक्तिक व्हॉट्सअॅप चॅट लीक केले होते.

गेल्या महिन्यात बाबर आझम आणि पीसीबी सीओओ सलमान नासीर यांच्यातील वैयक्तिक व्हॉट्सअॅप चॅट टीव्हीवरून सार्वजनिक करण्यात आले होते. त्यावेळी बाबर आझम आणि पीसीबीमधील वाद चव्हाट्यावर आला होता. आता जिओ स्पोर्ट्सने दिलेल्या वृत्तानुसार लीक चॅट प्रकरणी बाबर आझम कायदेशीर कारवाई करता येते का याचा विचार करत आहे.

बाबर आझमने का उचललं हे पाऊल?

बाबर आझमने व्हॉट्सअॅप लीक प्रकरणी कायदेशी कारवाईचा विचार करत असल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधोरेखित झालं आहे. देशाच्या संघाचा कर्णधार राहिलेल्या बाबर आझमचे वैयक्तिक संभाषण असं सार्वजनिक करणे ही चिंतेची बाब आहे. फक्त प्रायव्हसीचा विषय नाही तर क्रिकेट व्यवस्थापनाबद्दलच्या त्याच्या नात्यावरही याचा परिणाम झाला आहे.

बाबर आता या प्रकरणाचा सोक्षमोक्ष कायदेशीरित्या लावणार आहेत. यावरून त्याने क्रिकेट बोर्डासोबतच्या संभाषणाची गुप्तता कसोशीने पाळली जावी यासाठी हे पाऊल उचलल्याचे दिसून येते.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

Pune Drone Cluster: पुण्यात ड्रोन अन् खाद्यप्रक्रिया क्लस्टर; राज्यातील पहिलाच उपक्रम, भोसरी, हडपसरमध्ये सुरू होणार प्रकल्प!

Pandharpur News: पंढरपुरातील प्रस्तावित कॉरिडॉरला तीव्र विरोध; सुब्रह्मण्यम स्वामींच्या मोहिमेस पाठिंबा देण्यासाठी बाधितांचा शंखनाद!

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Solapur News: भारताच्या दणदणीत विजयानंतर सोलापुरात जल्लोष; पाकिस्‍तानला लाेळविताच आतषबाजी, पेढे वाटून, तिरंगा उंचावून आनंदोत्सव साजरा!

SCROLL FOR NEXT