Shubman Gill Babar Azam  esakal
क्रीडा

Shubman Gill Babar Azam : भारतीय संघाच्या एका निर्णयामुळे बाबर आझमचा होणार मोठा फायदा, गिलला होती सुवर्णसंधी मात्र...

अनिरुद्ध संकपाळ

Shubman Gill Babar Azam :

भारतीय संघव्यवस्थापनाने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात सलामीवीर शुभमन गिलला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयामुळे पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचा मोठा फायदा होणार आहे. तो आयसीसी वनडे बॅटिंग रँकिंगमध्ये आपले अव्वल स्थान अबाधित राखू शकणार आहे.

भारताचा सलामीवीर शुभमन गिलने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या दोन वनडे सामन्यात 74 आणि 104 धावा केल्या होत्या. तिसऱ्या सामन्यात जर गिलने अजून 22 धावा केल्या असत्या तर गिल बाबर आझमचे अव्वल स्थान हिसकावून घेऊ शकला असता. मात्र गिलला आता ही संधी मिळणार नाहीये. तो राजकोट सामन्यात खेळणार नाहीये.

आयसीसीने गेल्या बुधवारी आपले रँकिंग अपडेट केले होते. त्यात भारताचा सलामीवीर 814 रेटिंग पॉईंट्स घेत दुसऱ्या स्थानावर होता. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम सध्या 857 रेटिंग पॉईंट घेत अव्वल स्थानावर आहे. या रँकिंग अपडेटनंतर गिलने ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिल्या वनडे सामन्यात 74 तर दुसऱ्या सामन्यात 97 चेंडूत 104 धावांची खेळी केली होती.

शुभमन गिलला वेस्ट इंडीजचा दौरा फारसा चांगला गेला नव्हता. मात्र त्याने आशिया कपमध्ये आपला फॉर्म परत मिळवला. तो आशिया कप 2023 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. हीच कामगिरी त्याने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेत देखील कायम ठेवली. याच मालिकेत त्याला वनडे रँकिंगमधील अव्वल स्थानावर विराजमान होण्याची संधी होती. मात्र आता त्याला वर्ल्डकपपर्यंत थांबावे लागणार आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Rate Today: सोनं-चांदीच्या भावात मोठी घसरण! 11 सप्टेंबरला पुन्हा दर कोसळणार? जाणून घ्या ताजी अपडेट

‘त्याला माझी इनसिक्युरिटी वाटायची’; अनेक वर्षांनंतर नीना गुप्तांनी उघड केलं गुपित, म्हणाल्या...'माझ्यापेक्षा जास्त...'

ChatGPT's 80s Photo Trend: Instagram वर व्हायरल होतोय 'ChatGPT ’80s Photo Trend'; 'हा' सोपा प्रॉम्प्ट वापरून तयार करा तुमचा ८० च्या दशकातील रेट्रो लूक!

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

Share Market Today: इराणच्या अमेरिकेला धमकीने शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 500 अंकांनी खाली; कोणत्या शेअर्सला मोठा फटका?

SCROLL FOR NEXT