P. V. Sindhu Sakal
क्रीडा

P. V. Sindhu : आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही. सिंधूची विजयी सलामी

पी. व्ही. सिंधू हिने आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरी विभागात दमदार कामगिरी करताना मलेशियाच्या गोह जिन वेई हिच्यावर तीन गेममध्ये विजय मिळवत पुढे पाऊल टाकले.

सकाळ वृत्तसेवा

निंगबो (चीन) : स्टार खेळाडू पी. व्ही. सिंधू हिने आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरी विभागात दमदार कामगिरी करताना मलेशियाच्या गोह जिन वेई हिच्यावर तीन गेममध्ये विजय मिळवत पुढे पाऊल टाकले.

मात्र, पुरुषांच्या विभागात लक्ष्य सेन, किदांबी श्रीकांत, एच. एस. प्रणोय व प्रियांशू राजवत या चारही खेळाडूंना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे भारतीयांसाठी हा दिवस निराशाजनक ठरला.
पी. व्ही. सिंधू हिने याआधी गोह जिन वेई हिच्यावर चार सामन्यांत विजय मिळवले होते. मात्र, दोन खेळाडूंमध्ये झालेल्या मागील लढतीत सिंधूचा पराभव झाला होता. सुदिरमन करंडकात सिंधूकडून निराशा झाली होती.

मात्र, आशियाई स्पर्धेतील या लढतीत सिंधूने कडव्या संघर्षानंतर विजयाला गवसणी घातली. मलेशियाच्या बॅडमिंटनपटूने पहिला गेम २१-१८ असा जिंकत १-० अशी आघाडी घेतली. मात्र, पुढील दोन गेममध्ये भारताच्या फुलराणीने झोकात पुनरागमन केले. तिने दुसरा गेम २१-१४ असा, तर तिसरा गेम २१-१९ असा जिंकला.

यामुळे सिंधूला पुढल्या फेरीत प्रवेश करता आला. पी. व्ही. सिंधूसमोर पुढल्या फेरीत चीनच्या हॅन युई हिचे आव्हान असणार आहे. सिंधूसाठी ही लढत सोपी असण्याची दाट शक्यता आहे. कारण याआधी झालेल्या पाचही लढतींमध्ये सिंधूने तिला पराभूत करण्याची किमया करून दाखवली आहे.

इतर खेळाडूंकडून निराशा

पी. व्ही. सिंधूने विजय मिळवत पुढे पाऊल टाकले असले तरी भारताच्या इतर खेळाडूंकडून निराशा झाली. पुरुष विभागात चारही खेळाडू पराभूत झाले. तसेच महिला एकेरीत मालविका बन्सोड व आकर्षी कश्‍यप यांना हारचा सामना करावा लागला. एम. आर. अर्जुन- ध्रुव कपिला व ट्रीसा जॉली- गायत्री गोपीचंद यांनाही दुहेरीत अपयशाचा सामना करावा लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT