saina nehwal  esakal
क्रीडा

Badminton : दुखापतीमुळे साईनाची निवड चाचणीतून माघार

इतर सर्व खेळाडू आशियाई स्पर्धेत प्रवेश करण्यासाठी निवड चाचणी स्पर्धेत खेळणार आहेत, असे त्यांच्याकडून पुढे सांगण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : भारताची अनुभवी बॅडमिंटन खेळाडू साईना नेहवाल हिने चीनमधील हांगझू येथे २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या दरम्यान खेळवण्यात येणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीच्या राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेमधून माघार घेतली आहे. दुखापत व तंदुरुस्तीमुळे तिने या निवड चाचणीत न खेळण्याचा निर्णय घेतल्याचे भारतीय बॅडमिंटन संघटनेकडून (बीएआय) सोमवारी कळवण्यात आले आहे.

भारतीय बॅडमिंटन संघटनेच्या वतीने ४ ते ७ मे या दरम्यान तेलंगणा येथील ज्वाला गुट्टा अकादमीत निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. बीएआयचे सचिव संजय मिश्रा यांनी याप्रसंगी सांगितले की, साईना नेहवाल पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे ती या निवड चाचणीत सहभागी होणार नाही. तसेच कुशल राज व प्रकाश राज ही पुरुष दुहेरीतील जोडीही या स्पर्धेमध्ये खेळणार नाहीत. इतर सर्व खेळाडू आशियाई स्पर्धेत प्रवेश करण्यासाठी निवड चाचणी स्पर्धेत खेळणार आहेत, असे त्यांच्याकडून पुढे सांगण्यात आले.

निवड चाचणी स्पर्धेमधून पुरुष व महिला एकेरी गटासाठी प्रत्येकी तीन खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. मिश्र दुहेरी गटातून दोन जोड्यांची निवड होणार आहे. पुरुष दुहेरी व महिला दुहेरी या दोन्ही गटामधून प्रत्येकी एक जोडीला आशियाई स्पर्धेसाठी संधी देण्यात येणार आहे.

निवड चाचणीसाठी खेळाडूंची यादी

  • पुरुष एकेरी - लक्ष्य सेन, किदांबी श्रीकांत, प्रियांशू राजवत, मिथून मंजूनाथ, साई प्रणीत, मैसनाम मायरबा, भारत राघव, अन्सल यादव, सिद्धांत गुप्ता.

  • महिला एकेरी - आकर्शी कश्‍यप, मालविका बन्सोड, अश्‍मिता छलीहा, अदिती भट, उन्नती हूडा, अलीशा नाईक, श्रियांशी वालीशेट्टी, अनुपमा उपाध्याय.

  • पुरुष दुहेरी - एम.आर. अर्जुन - ध्रुव कपिला, कृष्णाप्रसाद - विष्णूवर्धन, सूरज गोएला - पृथ्वी रॉय, नितीन एच.व्ही.- साई प्रतीक.

  • महिला दुहेरी - अश्‍विनी भट - शिखा गौतम, तनीशा क्रॅस्टो-अश्‍विनी पोन्नाप्पा, राधिका शर्मा - तन्वी शर्मा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवे शिक्षणमंत्री B.A पास , प्रल्हाद जोशींची संपत्ती किती? कोट्यवधींचे मालक तरी ना कार, ना बाइक

Pune News: ६ कोटींचे काम रखडले; एम्प्रेस गार्डनसमोरील 'प्रिन्स ऑफ वेल्स ड्राइव्ह' खड्ड्यांच्या विळख्यात

Latest Marathi News Update : शिवाजी पार्कवर विजयोत्सव, तिरंगा हातात घेऊन तरुणाईची गर्दी

CJP Protest: शैक्षणिक प्रश्नांनाचे काय? देशव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांचा सवाल

Who is Sher Singh: "देशच वाचला नाही तर नोकरीचे काय करू?"; कोण आहे जंतर-मंतरच्या आंदोलनातला तो पोलीस? viral video नंतर चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT