Bajaj Allianz Pune Half Marathon 2023 Sakal
क्रीडा

Bajaj Allianz Pune Half Marathon 2023 : थंडीच्या आगमनामुळे मॅरेथॉनची उत्कंठा शिगेला

पुणे आणि थंडी हे समीकरण येत्या रविवारी होणाऱ्या बजाज अलियान्झ पुणे हाफ मॅरेथॉनसाठी अगदी वेळेत जुळून आले

सकाळ वृत्तसेवा

Bajaj Allianz Pune Half Marathon 2023 : पुणे आणि थंडी हे समीकरण येत्या रविवारी होणाऱ्या बजाज अलियान्झ पुणे हाफ मॅरेथॉनसाठी अगदी वेळेत जुळून आले आहे! गेल्या आठवड्यापर्यंत थंडीचा पत्ता नव्हता, मात्र मंगळवारी थंडीच्या आगमनाचे टायमिंग जुळून आले. त्यामुळे या शर्यतीची उत्कंठा शिगेला पोचली आहे.

सुविधांचे पाठबळ

या स्पर्धेत प्रत्येक गटातील धावपटूंना आवश्यक सुविधा मिळाव्यात म्हणून संयोजकांनी काटेकोर नियोजन केले आहे. तब्बल ३५० स्वयंसेवक विविध ठिकाणी मदतीसाठी तत्पर असतील. धावपटूंना मार्ग दाखविण्यासाठी दहा दुचाकी असतील.

एकूण चार रुग्णवाहिका महत्त्वाच्या ठिकाणी सज्ज असतील. मार्गावर शर्यतीच्या अंतरानुसार दिशादर्शक फलक, किलोमीटरचे फलक, वळणांवर कोन, अडथळे आदी व्यवस्था असेल. २१ किमी अंतराच्या हाफ मॅरेथॉनसाठी चार प्रथमोपचार केंद्रे, फिडींग आणि स्पंजिंगची दहा ठिकाणे असतील.

एक्स्पोचे ठिकाण सज्ज

शर्यतीसाठी स्पर्धकांना बीब, जर्सी आदी साहित्य घेता यावे म्हणून एक्सोचे आयोजन करण्यात आले आहे. म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात शुक्रवारी सकाळी ११ ते ६ आणि शनिवारी सकाळी १० ते ५ या वेळेत सहभागी धावपटू बीब कीट आपल्या ताब्यात घेऊ शकतील. तेथे विविध उत्पादक कंपन्यांचे स्टॉल लावण्यात आले आहेत.

सुधारणेची संधी

सहभागी स्पर्धकांना त्यांची तंदुरुस्ती, क्षमता आणि तयारीनुसार सर्वोत्तम वेळेत सुधारणा करण्याची संधी या शर्यतीत मिळते. त्यासाठी २१ किमी तसेच १० किलोमीटर शर्यतीसाठी पेसर्स निश्चित करण्यात आले आहेत. फिटपेज या संयोजक कंपनीच्यावतीने शहरातील प्रमुख ठिकाणी धावपटूंना मोफत प्रशिक्षण देण्यात आले.

त्यासाठी तज्ज्ञ ट्रेनर नेमण्यात आले. तेथे विविध वयोगटांमधील धावपटूंनी नावनोंदणी करून पद्धतशीर सराव केला. त्यामुळे हे धावपटू मॅरेथॉनची आतुरतेने प्रतिक्षा करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Personal Loan: 8.75% पासून लोन! SBI, HDFC पासून ICICI, AXIS पर्यंत कोणती बँक देतंय सर्वात स्वस्त कर्ज? लोन घेण्याआधी हे पाहा

परदेशात राहूनही जोडली मराठीशी नाळ!अमेरिकेत अश्विनी भावेंचा मराठमोळा अंदाज; हातात ढोल-ताशा घेत केलं वादन! Viral Video

Maratha Reservation: मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा दहावा दिवस; अंबादास दानवेंची भेट, १२ सप्टेंबरनंतर मुंबईकडे कूचचा इशारा

PWD Engineer Assault : भाजप नेता अन् PWD इंजिनिअरची तूफान हाणामारी, चेहऱ्याला चिखलही फासला; लोक भांडण सोडवायला आले पण... VIDEO VIRAL

लोकांना पॉर्न दाखवून युक्रेन लढणार युद्ध, २३६ कोटींच्या कमाईतून ३० हजार ड्रोन खरेदी करता येणार; झेलेन्स्की मोठ्या निर्णयाच्या तयारीत

SCROLL FOR NEXT