BCCI Annual Contract sakal
क्रीडा

BCCI Annual Contract: बीसीसीआयचा वार्षिक करार जाहीर! दिग्गज खेळाडूची मोठी बढती; एका झटक्यात करोडोंचा नफा

Kiran Mahanavar

BCCI Annual Contract : बीसीसीआयने ऑक्टोबर 2022 ते सप्टेंबर 2023 साठी करार जाहीर केला आहे. करारामध्ये एकूण 26 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआयने खेळाडूंना A+, A, B आणि C या 4 श्रेणींमध्ये स्थान दिले आहे.

A+ ग्रेडमध्ये चार खेळाडू आहेत. यामध्ये कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांचा समावेश आहे. यात जडेजाची एंट्री नवीन आहे. या यादीत समाविष्ट असलेल्या खेळाडूंना बीसीसीआय वार्षिक रिटेनरशिप फी म्हणून 7 कोटी रुपये देते.

बीसीसीआयने वार्षिक करारात 5 खेळाडूंना ए-ग्रेडमध्ये ठेवले आहे. त्याच वेळी 6 खेळाडू बी श्रेणीमध्ये आणि 11 खेळाडू-सी श्रेणीमध्ये समाविष्ट आहेत.

  • हार्दिक पांड्या, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, ऋषभ पंत आणि अक्षर पटेल यांना ए ग्रेडमध्ये ठेवण्यात आले आहे.

  • लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, चेतेश्वर पुजारा, मोहम्मद सिराज, सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल यांना बी-ग्रेडमध्ये स्थान मिळाले आहे.

  • तशिखर धवन, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, इशान किशन, दीपक हुडा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग आणि केएस भरत यांचा सी-ग्रेडमध्ये समावेश आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ A श्रेणीत समाविष्ट असलेल्या खेळाडूंना वार्षिक 5 कोटी रुपये देते. बी ग्रेडमध्ये समाविष्ट असलेल्या खेळाडूंना 3 कोटी रुपये आणि सी श्रेणीमध्ये समाविष्ट असलेल्या खेळाडूंना वार्षिक रिटेनरशिप फी म्हणून 1 कोटी रुपये मिळतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar: मुलाच्या उमेदवारीसाठी पाठिंबा द्या, शिवसेनेच्या नेत्याची सुनेत्रा पवारांना विनंती

IPL 2026: २८१ स्ट्राईक रेट अन् ९३ धावा... रजत पाटिदार प्लेऑफचा 'दादा'; Final मध्ये पोहचताच म्हणाला, 'आम्ही तुमच्यावर चालून येतोय...'

Sant Nivruttinath Rath: संत निवृत्तिनाथांच्या रथास यंदा सुरेगावची बैलजोडी; इतिहासात प्रथमच सिन्नर तालुक्याला मान

Yavatmal: शिंदेसेनेच्या नगरसेवकांवर प्राणघातक हल्ला

NCP Internal Conflict : सुनेत्रा पवारांसमोर तटकरे-भुजबळांमध्ये वादावादी; पार्थ पवार तडकाफडकी निघून गेले, देवगिरी बंगल्यावरील वातावरण तापलं

SCROLL FOR NEXT