BCCI Donations CCI  esakal
क्रीडा

BCCI Donations : सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटनेला खासदारांच्या फिटनेसची चिंता; दिले कोट्यावधींचे डोनेशन

अनिरुद्ध संकपाळ

BCCI Donations CCI : जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना बीसीसीआयने गेल्या आर्थिक वर्षाचा हजार कोटींचा इनकम टॅक्स भरला आहे. आता बीसीसीआयने खासदारांच्या आरोग्यासाठी देखील मोठे डोनेशन दिल्याचे समोर आले आहे. राजधानी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियाला ( CCI) बीसीसीआयने 2.25 कोटी रूपयांची जीम उपकरणे ही डोनेशन म्हणून दिली आहेत.

या आठवड्यात बीसीसीआयने 21 डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या आपल्या अपेक्स काऊन्सील बैठकीतील मुद्दे जाहीर केले. यात सीसीआयची विनंती मान्य केल्याचा उल्लेख आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष आणि सीसीआयचे स्पोर्ट्स सचिव असलेले राजीव शुक्ला हे या बैठकीला उपस्थिती होते.

दरम्यान, काँग्रेसचे खासदार असलेल्या राजीव शुक्लांना याबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली मात्र ते प्रतिक्रिया देण्यासाठी उपलब्ध नव्हते. मात्र बीसीसीआयच्या एका प्रतिनिधीने सांगितले की यापूर्वीही बीसीसीआयने सीसीआयला आर्थिक मदत केली आहे.

इंडियन एक्सप्रेसशी बोलताना बीसीसीआय अधिकारी म्हणाले की, 'यापूर्वीही सीसीआयने बीसीसीआयकडे आर्थिक मदत मागितली होती आणि बीसीसीआये ही आर्थिक मदत केली आहे. यावेळी त्यांनी त्यांच्या सोयी सुविधांमध्ये सुधारणा करण्याची विनंती केली होती.'

बीसीसीआयच्या या बैठकीत बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी सीसीआयच्या सदस्यांनी जीमचे साहित्य खरेदी करण्यासाठी निधीची मागणी केल्याचे सांगितले.

'उपलब्धता आणि किंमतींवरील वाटाघाटीनंतर बीसीसीआयने 2.27 कोटी रूपयांची मदत केली आहे. सीसीआयला जीम उपकरणांसाठी सर्वसाधारणपणे 2.25 कोटी रूपये डोनेशन देण्याचा प्रस्ताव आहे. सदस्यांनी सीसीआयला थेट 2.25 कोटी रूपये डोनेट करण्यास मान्यता दिली आहे.'

बीसीसीआयने आर्थिक वर्ष 2021 - 22 मध्ये 1159 कोटी रूपये इनकम टॅक्स भरला आहे. बीसीसीआयने गेल्या वर्षीपेक्षा 37 टक्के जास्त इनकम टॅक्स भरला आहे.

राज्य सभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला लिखीत उत्तर देताना अर्थ खात्याचे राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी बीसीसीआयच्या इनकम टॅक्सबाबतची माहिती दिली. याचबरोबर गेल्या पाच वर्षातील बीसीसीआयच्या उत्पन्नाची आणि खर्चाची माहिती दिली.

बीसीसीआयने 2020 - 21 या आर्थिक वर्षात 844.92 कोटी रूपये इनकम टॅक्स भरला होता. त्याच्या आदल्या आर्थिक वर्षात 882.29 कोटी रूपये इनकम टॅक्स भरला होता.

बीसीसीआयने 2019 मध्ये 596.63 इनकम टॅक्स भरला होता. बीसीसीआयने 2021 - 22 मध्ये बीसीसीआयने 7606 कोटी रूपयांची कमाई केली होती. त्यातील 3064 कोटी रूपये खर्च केले होते.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Navy Sailor Family Death: नौदलाच्या खलाशासह पत्नी अन् २ मुलांचे मृतदेह आढळल्यानं खळबळ, २ महिन्यांच्या चिमुकल्याचा समावेश

Raigad News: महाड MIDCमध्ये पुन्हा गॅसगळती, एका कामगाराचा मृत्यू, ८ जण जखमी

Viral Video : तीन वर्षांचा चिमुकला आईची तक्रार घेऊन थेट पोलीस चौकीत पोहोचला, म्हणाला- तिला जेलमध्ये टाका; कारण ऐकून पोलिसांनाही आवरेना हसू

Marathi News Live Updates : मुंबईत भारतीय नौदलाचा खलाशी, पत्नी आणि दोन अल्पवयीन मुले मृतावस्थेत आढळली

IND vs SL 1st Test : एकही चेंडू न खेळता, भारत-श्रीलंकेचे खेळाडू जेवायला गेले! गौतम गंभीरचं डोकं फिरलं; गॉलवर नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT