BCCI Income Tax esakal
क्रीडा

BCCI Income Tax : जेवढा एका कंपनीचा टर्न ओव्हर नसतो तितका BCCI ने इन्कम टॅक्स भरला

अनिरुद्ध संकपाळ

BCCI Income Tax : बीसीसीआय हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे हे सर्वांना माहितीच आहे. मात्र गेल्या काही काळापासून बीसीसीआय कमाईच्या बाबतीत कोटीच्या कोटी उड्डाणे घेत आहे. आयपीएलच्या मीडिया राईट्स आणि ओटीटी राईट्सच्या विक्रीतून बीसीसीआयने जवळपास 50 हजार कोटींचा गल्ला कमावला होता.

आता याच कमाईच्या जोरावर बीसीसीआयने 2021 - 22 या आर्थिक वर्षात जवळपास 1 हजार 159 कोटी रूपये निव्वळ इन्कम टॅक्स भरला आहे. विशेष म्हणजे गेल्या 2020 - 21 या आर्थिक वर्षापेक्षा ही रक्कम 37 टक्क्यांनी जास्त आहे.

बीसीसीआय सध्या भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपच्या तयारीला लागला आहे. मात्र यापूर्वी त्यांना पैसा कमवून देणारा एक लिलाव देखील करायचा आहे. बीसीसीआयने भारतात होणाऱ्या द्विपक्षीय मालिकांसाठीचे माध्यम प्रसारण हक्क विक्रीच्या लिलावाची प्रक्रिया सुरू केली आहे.

गेल्यावेळी या लिलावात डिस्ने - स्टारने गेल्या लिलावात 103 सामन्यांसाठी 6138.10 कोटी रूपये मोजले होते. डिस्ने - स्टार एका सामन्यासाठी जवळपास 61कोटी रूपये बीसीसीआयला देत होता. बीसीसीआयने आता टीव्ही प्रक्षेपण आणि डिजीटल स्ट्रीमिंगसाठी वेगवेगळे हक्क विकले जाणार आहेत. यातून बीसीसीआयला 12000 कोटींच्या कमाईची अपेक्षा आहे.

बीसीसीआय एका सामन्यासाठी जवळपास 100 कोटींची अपेक्षा आहे. मात्र बीसीसीआयने नियुक्त केलेल्या सल्लागार कंपनीने लिलावात गेल्या 6195 कोटींच्या महसुलात फार थोडी वाढ होईल असे सांगितले होते. प्रती सामन्यांचे मुल्य हे 61 कोटीच्या आसपासच राहण्याची शक्यता त्यांनी वर्तवली होती.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT