MI vs GT Playing 11 Arjun Tendulkar  esakal
क्रीडा

Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकरला लागली लॉटरी, थेट BCCIचा आला फोन!

‘बीसीसीआय’कडून आता अष्टपैलूंचा शोध! २० नवोदित खेळाडूंची निवड

सकाळ ऑनलाईन टीम

जागतिक कसोटी अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध दारुण पराभव झाल्यानंतर बीसीसीआय आता ‘अॅक्शन मोड’वर आले आहे. देशभरातून २० नवोदित अष्टपैलू खेळाडूंची निवड केली आहे आणि त्यांना तीन आठवड्यांच्या सराव शिबिरासाठी बंगळूर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पाचारण करण्यात आले आहे. या २० खेळाडूंत अर्जुन तेंडुलकरचाही समावेश आहे.

या वर्षअखेरीस इमर्जिंग आशिया करंडक (२३ वर्षांखालील) ही स्पर्धा होणार आहे. त्यासाठी बीसीसीआयने नवोदित खेळाडूंचाही शोध सुरू केला आहे. त्यासाठी या २० खेळाडूंमधील काही अव्वल खेळाडूंचा उपयोग होऊ शकेल. क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्ही. व्ही. एस. लक्ष्मण तिन्ही फॉरमॅटसाठी गुणवत्ता शोधण्यासाठी प्राधान्य देत आहेत, अशी माहिती बीसीसीआयच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याने दिली. हे २० खेळाडू निवडण्यासाठी निवड समितीचे अध्यक्ष एस. एस. दास यांनीही मदत केल्याचे सांगण्यात आले.

आता केवळ अष्टपैलू गुणवत्ता असलेले खेळाडू आम्ही शिबिरासाठी निवडले आहेत. यातील काही प्रामुख्याने फलंदाज-गोलंदाज आहेत, तर काही जण गोलंदाज अष्टपैलू आहेत. त्यांच्याकडे असलेल्या गुणवत्तेत अजून प्रगती करण्यासाठी हा प्रयत्न आहे, असेही बीसीसीआयच्या या सूत्रांचे म्हणणे आहे.

या २० खेळाडूंत सौराष्ट्राचा डावखुरा वेगवान गोलंदाज आणि आक्रमक फटकेबाज चेतन साकारिया याचा समावेश आहे. २०२१ मध्ये तो खेळलेला आहे, तसेच आयपीएलमध्ये तो दिल्ली संघात होता. पंजाबचा अभिषेक शर्मा, गोव्याचा मोहित रेडकर, राजस्थानचा मानव सुतार, दिल्लीतील हर्षित राणा आणि दिविज मेहरा यांनाही संधी देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: गर्भवती असतानाही Mains दिली; 26 दिवसांच्या बाळाला कडेवर घेऊन मुलाखत दिली अन् थेट DSP झाली!

स्टेशनवर गर्दी, ट्रेनमध्ये चढण्याऐवजी वृद्ध थेट इंजिनवरच उभा राहिला; VIDEO VIRAL

जरागेंच्या उपोषणाचा १० वा दिवस, प्रकृती खालावल्यानं मराठा बांधवांचा सरकारला इशारा | Jarange Patil

Marathi News Live Updates : सर्वोच्च न्यायालयाने अरावली पर्वताबाबत अहवालाची मुदत वाढवण्याची याचिका फेटाळली

Ahilyanagar News: अहिल्यानगरच्या चार तालुक्यांचा होणार कायापालट; आकांक्षित तालुका योजनेत प्रत्येकी ५ कोटींचा अतिरिक्त निधी

SCROLL FOR NEXT