ICC Award Ben Stokes esakal
क्रीडा

ICC Award : कसोटीत बेन स्टोक्सचा मास्टर स्ट्रोक; पटकावला Test Cricketer of the Year चा पुरस्कार

अनिरुद्ध संकपाळ

ICC Award Ben Stokes : इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने आयसीसी कसोटी क्रिकेटर ऑफ द इयरचा पुरस्कार जिंकला. बेन स्टोक्सने जेव्हापासून इंग्लंडचा कसोटी कर्णधार झाला आहे. तेव्हापासून इंग्लंडचा संघ आक्रमक कसोटी क्रिकेट खेळतोय. कसोटीत बेन स्टोक्सने देखील गेल्या वर्षभरात कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे.

बेन स्टोक्सने 2022 मध्ये कसोटीमध्ये 36.25 च्या सरासरीने 870 धावा केल्या आहेत. तर 31.19 च्या सरासरीने 26 विकेट्स घेतल्या आहेत. जरी बेन स्टोक्सचे 2022 मधील कसोटीमध्ये आकडे चांगले असले तरी ज्या परिस्थिती बेन स्टोक्स इंग्लंड कसोटी संघाचा कर्णधार झाला ती आव्हानात्मक परिस्थिती होती. इंग्लंडचा अॅशेसमध्ये व्हाईट वॉश झाला होता. इंग्लंड संघात बदलाचे जोराचे वारे वाहत होते.

मात्र ब्रँडन मॅक्युलम इंग्लंड कसोटी संघाचा कोच झाला. तर जो रूटकडून स्टोक्सकडे कसोटी संघाचे कर्णधारपद आले. त्यानंतर इंग्लंडच्या संघाने अत्यंत आक्रमक कसोटी खेळण्या सुरूवात केली. त्यामुळे इंग्लंडचा कसोटी संघ एका वेगळ्याच उंचीवर गेला. बेन स्टोक्स कर्णधार झाल्यापासून 10 कसोटी सामन्यापैकी 9 सामने जिंकले आहेत.

इंग्लंडने न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिकेला मायदेशात हरवले. त्यानंतर भारतासोबत झालेल्या एकमेव कसोटी सामन्यात विजय मिळवत मालिका 2 - 2 अशी बरोबरीत सोडवली. त्यानंतर पाकिस्तानला पाकिस्तानमध्ये 3 -0 असा व्हाईट वॉश देत ऐतिहासिक विजय मिळवला.

(Sports Latest News)

हेही वाचा : ....इथं तयार होतो आपला लाडका तिरंगा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day Live Update : लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात

शहर हद्दीतही दोन्ही बाजूला ३० मीटरचेच बंधन! महामार्गांलगतच्या हॉटेल, ढाब्यांवर ६० दिवसांत हातोडा; जिल्हाधिकाऱ्यांकडून ‘कृती दल’ स्थापन, वाचा...

Tricolor Cheese Toast Recipe: या स्वातंत्र्यदिनाला नाश्त्यात करा काहीतरी हटके! १० मिनिटांत बनवा चीजने भरलेला ‘तिरंगा टोस्ट’

Career Horoscope: सरकारी नोकरीत मिळवतात यश; ‘या’ राशींना मिळते नशिबाची साथ, करिअरमध्ये करतात मोठी प्रगती, तुमची रास कोणती?

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १५ ऑगस्ट २०२६ ते २१ ऑगस्ट २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT