Bhuvaneshwar Kumar sakal
क्रीडा

Bhuvaneshwar Kumar: आधी पाक अन् आता लंका; 'त्या' 2 ओव्हरने टीम इंडियाला बाहेर!

पाकिस्तान असो वा श्रीलंका दोन्ही सामन्यांमध्ये भुवनेश्वर कुमारने भारतासाठी 19 वे षटक टाकले आणि दोन्ही षटकात त्यांनी....

Kiran Mahanavar

Bhuvneshwar Kumar Asia Cup 2022 : आशिया चषक स्पर्धेत सलग दुसऱ्या पराभवामुळे भारतीय संघ या स्पर्धेतून जवळपास बाहेर पडला आहे. सुपर 4 च्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर टीम इंडियाचा मंगळवारी श्रीलंकेकडूनही पराभव झाला. टीम इंडियाला आशिया कपच्या अंतिम फेरीत आता पोहोचणे खूप कठीण आहे. दोन्ही सामन्यांमध्ये टीम इंडियाचा शेवटच्या षटकात पराभव झाला. T20 सामन्यांमध्ये शेवटचे षटक खूप महत्त्वाचे असते. विशेषत: 19 वे षटक कारण येथे दबाव निर्माण करणे. पाकिस्तान असो वा श्रीलंका दोन्ही सामन्यांमध्ये भुवनेश्वर कुमारने भारतासाठी 19 वे षटक टाकले आणि दोन्ही षटकात त्यांनी खराब कामगिरी खराब केली, त्यानंतर टीम इंडियाला सामन्यात पुनरागमन करणे खूप कठीण झाले.

टीम इंडियाविरुद्ध पाकिस्तानला शेवटच्या दोन षटकात 26 धावांची गरज होती, इथे भुवनेश्वर कुमारने 19 वे षटक टाकले. मात्र या षटकात त्याने 19 धावा दिल्या, त्यानंतर पाकिस्तानचा विजय जवळपास निश्चित झाला. अर्शदीप सिंगने 20 वे षटक टाकले, ज्यामध्ये शेवटच्या षटकात 7 धावा वाचवण्यात त्याला यश आले नाही. असाच श्रीलंकेविरुद्ध घडला, जेव्हा शेवटच्या दोन षटकांत श्रीलंकेला विजयासाठी 21 धावांची गरज होती. येथेही रोहित शर्माने भुवनेश्वर कुमारला 19 वे षटक दिले, ज्यात त्याने 14 धावा दिल्या. येथे भुवनेश्वरनेही अतिरिक्त धावा दिल्या, त्यानंतर अर्शदीप सिंगने 20 वे षटक टाकले आणि येथेही तो 7 धावा वाचवू शकला नाही.

श्रीलंकेविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडियाला आशिया कपच्या अंतिम फेरीत पोहोचणे कठीण झाले आहे. सुपर-फोर सामन्यात श्रीलंकेने भारताचा सहा गडी राखून पराभव केला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने श्रीलंकेला 174 धावांचे लक्ष्य दिले होते जे त्यांनी 19.5 षटकात पूर्ण केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते; पहाटे 2.30 वाजता होणार महापूजा

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

SCROLL FOR NEXT