Football Match at Shahu Maidan Kolhapur esakal
क्रीडा

शाहू मैदानावर फुटबॉल सामन्यात हुल्लडबाजी! समर्थकांनी फेकल्या माव्याच्या थुंकीने भरलेल्या बाटल्या, दगड; पोलिसांचा लाठीमार

अटीतटीच्या सामन्यात (Football Match Kolhapur) अतिउत्साही व हुल्लडबाज समर्थकांनी दगड, बाटल्यांसह चपला मैदानावर भिरकावल्या.

सकाळ डिजिटल टीम

दगड लागल्यामुळे काही समर्थक जखमीही झाले. यामुळे मैदान परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला.

कोल्हापूर : येथील शाहू मैदानावर रंगलेल्या श्री शिवाजी तरुण मंडळ (Shivaji Tarun Mandal) विरुध्द पाटाकडील तालीम ‘अ’ या संघांतील अटीतटीच्या सामन्यात (Football Match Kolhapur) अतिउत्साही व हुल्लडबाज समर्थकांनी दगड, बाटल्यांसह चपला मैदानावर भिरकावल्या. या प्रकाराने मैदानावर गोंधळ व तणाव निर्माण झाला. पोलिसांनी सौम्य लाठीमार करत जमाव पांगवला.

श्री शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध पाटाकडील तालीम मंडळ (Patakadil Talim Mandal) ‘अ’ संघांदरम्यान झालेल्या सामन्यात दगडफेक झाली. अटीतटीच्या ठरलेल्या सामन्यात अतिउत्साही समर्थकांनी अर्वाच्च  शिवीगाळ केली. प्रेक्षकांच्या या कृतीमुळे मैदानावरील खेळाडूंमध्येदेखील जुंपली. मध्यंतरापर्यंत सामना सुरळीत सुरू होता. चेंडूवर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात दोन्ही संघांतील खेळाडूंमध्ये चढाओढ सुरू होती.

अशातच समर्थकांनी विरुद्ध संघाच्या खेळाडूंना प्रेक्षक गॅलरीतून शिवीगाळ करण्यास सुरुवात कली. दोन्ही बाजूच्या समर्थकांनी अर्वाच्च शिवीगाळ करत थेट मैदानावर बाटल्या, चप्पल, दगड भिरकावले. त्याला खेळाडूंनीही प्रत्युत्तर दिले. असे दोन्ही बाजूच्या समर्थकांकडून वारंवार होत राहिले. याचा परिणाम खेळाडूंवर होऊन त्यांच्यामध्येही वाद होऊ लागले. अखेर समर्थकांनी माव्याच्या थुंकीने भरलेल्या बाटल्या, गिलाव्याचे तुकडे, दगड, चप्पल अशा मिळेल त्या वस्तू मैदानावर व विरुद्ध संघाच्या समर्थकांच्या दिशेने भिरकवायला सुरुवात केली.

दगड लागल्यामुळे काही समर्थक जखमीही झाले. यामुळे मैदान परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. अखेर परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला. प्रेक्षक गॅलरीमध्ये असणारा गिलावा फोडून त्याचा वापर दगडाप्रमाणे करण्यात आला. समतल असणारे हे तुकडे मैदानावर लांब पल्ला गाठत होते. यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. तरीही मैदानाबाहेर चौकामध्ये समर्थक तळ ठोकून होते. 

पोलिसांची संख्या अपुरी

पोलिसांची अपुरी संख्याही यासाठी कारणीभूत असल्याचा आरोप मंडळ संघाचे विशाल बोंगाळे यांनी केला. त्यांनी केएसए कार्यालयात पोलिस बंदोबस्तासाठी अर्ज केला होता का? असा सवाल उपस्थित केला. यावर केएसएच्यावतीने कोणतेच उत्तर देण्यात आले नाही. 

सीसीटीव्ही कॅमेरे बंदच

‘केएसए’ने प्रेक्षक गॅलरीमधील गैरप्रकारावर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही  कॅमेरे बसवले आहेत; मात्र पोलिसांनी झालेला प्रकार समजून घेण्यासाठी फुटेजची मागणी केली असता, ते कार्यान्वित नसल्याचे कारण ‘केएसए’कडून देण्यात आले आहे.

खेळाडू-प्रेक्षकांमध्ये जुंपली

प्रेक्षकांकडून खेळाडूंच्या दिशेने भिरकावण्यात आलेल्या चपला व बाटल्या खेळाडूंनी परत प्रेक्षकांच्या दिशेने भिरकावल्या. या कृतीमुळे खेळाडू व प्रेक्षकांमध्ये जुंपली. अखेर प्रशिक्षक शिवाजी पाटील यांनी खेळाडूंना आवर घालत बाजूला नेण्याचा प्रयत्न केला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT