Champions League Football Marathi News sakal
क्रीडा

Champions League Football : उपांत्यपूर्व फेरीच्या लढती निश्‍चित! रेयाल माद्रिद-मँचेस्टर सिटीमध्ये रंगणार सामना

सकाळ ऑनलाईन टीम

City take on Real Madrid in Champions League quarter-final : चॅम्पियन्स लीग या युरोप खंडातील मानाच्या फुटबॉल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमातील उपांत्यपूर्व फेरीच्या लढती निश्‍चित झाल्या आहेत. या मोसमात साखळी फेरीच्या लढतींत सहाही लढती जिंकणाऱ्या रेयाल माद्रिद-मँचेस्टर सिटी दोन बलाढ्य संघांमध्ये उपांत्यपूर्व फेरीची लढत रंगणार आहे.

उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या टप्प्यातील लढत माद्रिदमध्ये होणार असून त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील लढत मँचेस्टरमध्ये पार पडणार आहे. रेयाल माद्रिद क्लबने १४ वेळा या स्पर्धेच्या अजिंक्यपदावर मोहोर उमटवली असून मॅंचेस्टर सिटी क्लबने गतवर्षी पहिल्यांदाच ही स्पर्धा जिंकण्याची किमया साधली आहे. यामुळे या दोन माजी विजेत्यांमधील लढत आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.

इतर लढतींवर दृष्टिक्षेप

आर्सेनल-बायर्न म्युनिच, ॲटलेटिको माद्रिद-बोरुसिया डॉर्टमंड व पॅरिस सेंट जर्मेन-बार्सिलोना अशा तीन उपांत्यपूर्व फेरीच्या लढती पार पडणार आहेत. चारही उपांत्यपूर्व फेरीचा टप्पा ९/१० एप्रिलला खेळवण्यात येईल. तसेच दुसरा टप्पा १६/१७ एप्रिलला रोजी आयोजित करण्यात येईल.

चार बलाढ्य संघ

चॅम्पियन्स लीग संयोजकांकडून स्पर्धेचा ड्रॉ असा पाडण्यात आला आहे की, चार बलाढ्य संघांमध्ये उपांत्यपूर्व फेरीची लढत रंगणार आहे. आर्सेनल-बायर्न म्युनिच व रेयाला माद्रिद-मँचेस्टर सिटी अशा या लढती असणार आहेत. या दोन लढतींतील विजेते एकमेकांसमोर उपांत्य लढतीत उभे ठाकणार आहेत. त्यामुळे पॅरिस सेंट जर्मेन-बार्सिलोना, ॲटलेटिको माद्रिद-बोरुसिया डॉर्टमंड यांचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास तुलनेने सोपा असणार आहे.

उपांत्यपूर्व फेरीच्या लढतींचे वेळापत्रक

  • आर्सेनल - बायर्न म्युनिच

  • ॲटलेटिको माद्रिद - बोरुसिया डॉर्टमंड

  • रेयाल माद्रिद - मँचेस्टर सिटी

  • पॅरिस सेंट जर्मेन - बार्सिलोना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत कोट्यवधींचं घर विकलं अन् घेतली बाईक! कारण काय? स्टार्टअप फाउंडरने सांगितली धक्कादायक निर्णयामागची कहाणी

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करा, संयुक्त जमीन मोजणीला गती द्या; शक्तिपीठ महामार्गाबाबत आवाहन

Marathi News Live Updates : पुण्यातील नऱ्हेतील भूमकर चौक ते श्री कंट्रोल चौकदरम्यान १२ हजार ४०० चौरस फुटांवरील अतिक्रमणे हटविली

Encroachment : नऱ्हेतील भूमकर चौक ते श्री कंट्रोल चौकदरम्यान १२ हजार ४०० चौरस फुटांवरील अतिक्रमणे हटविली

SCROLL FOR NEXT