Chereshwar Pujara Indian Test Team  esakal
क्रीडा

Cheteshwar Pujara : पुजाराला डच्चू देणं हे सकारात्मक पाऊल... माजी प्रशिक्षकांचे सडेतोड वक्तव्य

अनिरुद्ध संकपाळ

Chereshwar Pujara Indian Test Team : भारतीय संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर आहे. तेथे तो 12 जुलैपासून दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा आधीच झाली असून या संघात अनेक नव्या खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. भारताचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराला या संघातून वगळण्यात आले आहे.

पुजाराला कसोटी संघातून वगळण्यात आल्यानंतर या निर्णयाविरूद्ध अनेक लोकांना टीका केली. मात्र भारताचे माजी प्रशिक्षक लालचंद राजपूत यांना हा निर्णय योग्य वाटला आहे. मात्र त्यांना कसोटी संघात सर्फराज खानला स्थान न देण्याचा निर्णय योग्य वाटला नाही.

लालचंद राजपूत यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की, 'पुजाराला संघातून वगळणे हे भारतीय निवडसमितीचे एक सकारात्मक पाऊल आहे. कारण आता आपल्याला पुढच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची देखील तयारी करायची आहे. आता तुम्हाला युवा खेळाडूंना हळूहळू संघात आणले पाहिजे. तुम्हाला त्यांना ग्रुम करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी तयार करायला हवे.'

'मला आशा आहे की आता जास्तीजास्त युवा खेळाडूंना देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल. वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघात ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जैसवाल यांना संधी मिळाली आहे. या दोघांनी खूप धावा केल्या आहेत. ते आता संघाची बेंच स्ट्रेंथ स्ट्राँग करत आहेत.'

रणजी ट्रॉफीमध्ये सातत्याने धावा करणाऱ्या सर्फराज खानला वेस्ट इंडीज दौऱ्यावरील कसोटी संघात स्थान मिळाले नाही यावर राजपूत यांनी टीका केली आहे. सर्फराजला त्याच्या फिटनेस आणि खराब वर्तनुकीमुळे संघात स्थान मिळाले नाही अशी चर्चा सुरू आहे.

यावर राजपूत म्हणाले की, जर तो सलग तीन वर्षे सातत्याने धावा करतोय तरी त्याची संघात निवड होत नसेल तर नक्कीत काहीतरी कारण असणार. मला नाही माहिती की काय कारण आहे मात्र त्याला संधी द्यायला हवी.

लालचंद राजपूत यांना 2023 मध्ये होणाऱ्या वर्ल्डकपबाबत बोलताना म्हणाले की, जर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह स्पर्धा खेळला नाही तर तो भारतीय संघासाठी मोठा सेटबॅक असेल. भारताला मायदेशात खेळण्याचा नक्कीत फायदा होईल.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: देशात पहिल्यांदाच महाराष्ट्रात जमिनीसारखाच पाण्याचाही सातबारा; महसूल विभागाचा निर्णय

Nagpur: वैद्यकीय पदवी घेणारी पत्नी मानसिक अस्थिर कशी; आयपीएस अधिकाऱ्याची याचिका फेटाळली

Nagpur: नवतपाच्या पहिल्याच दिवशी चटके; ब्रह्मपुरीचा पारा ४७.६ तर, नागपूर ४६.५ अंशांवर

Rwanda Economy: रवांडा : आफ्रिकेतील उदयोन्मुख अर्थव्यवस्था

Satej Patil Hasan Mushrif : गोकुळ दूध संघात सतेज पाटील, मंत्री मुश्रीफांचे एकत्र पॅनेल? उघडउघड विरोध की अंतर्गत मैत्री जपणार

SCROLL FOR NEXT