Huang Yuting And Sheng Lihao Of China Win First Gold Medal Of Paris Olympics sakal
क्रीडा

Paris Olympic : १७ अन् १९ वर्षांच्या शूटरचा पॅरिसमध्ये डंका! 'या' देशाने ऑलिम्पिक २०२४मध्ये जिंकले पहिले 'गोल्ड मेडल'

China win first gold medal of Paris Olympics : : पॅरिस ऑलिम्पिकमधील पहिले सुवर्णपदक चीनच्या खात्यात गेले आहे.

Kiran Mahanavar

Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमधील पहिले सुवर्णपदक चीनच्या खात्यात गेले आहे. 10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिक स्पर्धेत सुवर्णपदकाच्या लढतीत चीनने दक्षिण कोरियाचा 16-12 असा पराभव केला.

19 वर्षांचा हुआंग यूटिंग आणि 17 वर्षांची शेंग लिहाओ यांनी हे सुवर्णपदक जिंकले. पात्रता फेरीतही चीनची ही जोडी अव्वल स्थानावर होती. तर दक्षिण कोरियाच्या केउम जिह्योन आणि हाजुन पार्क यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

कझाकस्तानने जिंकले कांस्यपदक

कझाकस्तानच्या अलेक्झांड्रा ले आणि इस्लाम सत्पायेव या जोडीने कांस्यपदक पटकावले आहे. या जोडीला कांस्यपदकाच्या लढतीत जर्मनीचे आव्हान होते. अलेक्झांड्रा ले आणि इस्लाम सत्पायेव यांनी 630.8 गुणांसह या सामन्यासाठी पात्र ठरले होते.

कांस्यपदकाचा सामना एकतर्फी झाला. ॲना जॅन्सेन आणि मॅक्सिमिलियन उलब्रिच या जर्मन जोडीचा 17-5 असा पराभव झाला. अशाप्रकारे 10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिक प्रकारातील तिन्ही पदके आशियाई देशाच्या नावे झाली.

हुआंग यूटिंगचे दुसरे ऑलिम्पिक मेडल

हुआंग युएटिंगचे हे ऑलिम्पिकमधील दुसरे मेडल आहे. वयाच्या 16 व्या वर्षी ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअर रायफल प्रकारात त्याने रौप्य पदक जिंकले होते. तर वयाच्या 17 व्या वर्षी शेंग लिहाओने जवळपास सर्वच स्पर्धांमध्ये सुवर्णपदके जिंकली आहेत. जागतिक चॅम्पियनशिपमध्ये त्यांची तीन सुवर्णपदके आहेत. याशिवाय गेल्या वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेतही त्याने तीन सुवर्णपदके जिंकली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT