Australia defeat Scotland 5 wickets England qualify for Super 8 T20 World Cup 2024  sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup 2024 Super 8 : स्कॉटलंडचे स्वप्न भंगले! ऑस्ट्रेलियाच्या विजयाची साहेबांच्या ताफ्यात पार्टी; इंग्लंडला मिळाले सुपर-8चे तिकीट

T20 World Cup 2024 AUS vs SCO highlights : टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये स्कॉटलंडने आपल्या स्फोटक कामगिरीने इंग्लंडला जवळपास बाहेर काढले होते, पण अखेरीस ऑस्ट्रेलियाच्या विजयाने जोस बटलरच्या संघाला दिलासादायक बातमी मिळाली आहे.

Kiran Mahanavar

Australia vs Scotland T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये स्कॉटलंडने आपल्या स्फोटक कामगिरीने इंग्लंडला जवळपास बाहेर काढले होते, पण अखेरीस ऑस्ट्रेलियाच्या विजयाने जोस बटलरच्या संघाला दिलासादायक बातमी मिळाली आहे.

टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या 35 व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने स्कॉटलंडचा 5 गडी राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियाच्या या विजयासह इंग्लंडचा संघ सुपर-8 मध्ये पोहोचला आहे. दुसरीकडे, स्कॉटलंडचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

सामन्यात प्रथम फलंदाज करताना स्कॉटलंड संघाची सुरुवात खुपच खराब झाली. अवघ्या 3 धावांच्या स्कोअरवर त्यांना पहिला धक्का बसला. सलामीवीर मायकेल जोन्स केवळ 2 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर जॉर्ज मुनसे आणि ब्रँडन मॅकमुलेन यांनी डावाची धुरा सांभाळली. या दोन्ही फलंदाजांनी दुसऱ्या विकेटसाठी 89 धावांची जबरदस्त भागीदारी केली. मुनसेने 23 चेंडूत 35 धावा केल्या आणि ब्रेंडन मॅकमुलेनने 34 चेंडूत 2 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 60 धावांची तुफानी खेळी केली.

स्कॉटलंडसाठी टी-20 वर्ल्ड कपमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक करण्याचा विक्रमही मॅकमुलेनच्या नावावर आहे. त्याने अवघ्या 26 चेंडूत अर्धशतक झळकावले. यानंतर कर्णधार रिची बेरिंग्टनने 31 चेंडूत नाबाद 42 धावा करत स्कॉटलंडला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले.

लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाला लवकरच पहिला धक्का बसला. डेव्हिड वॉर्नर अवघी 1 धाव करून पॅव्हेलियनमध्ये परतला. कर्णधार मिचेल मार्शलाही केवळ 8 धावा करता आल्या. ग्लेन मॅक्सवेललाही केवळ 11 धावा करता आल्या आणि 60 धावांपर्यंत कांगारू संघाने 3 विकेट गमावल्या होत्या.

मात्र, यानंतर ट्रॅव्हिस हेड आणि मार्कस स्टॉइनिस यांनी झंझावाती भागीदारी करत ऑस्ट्रेलियाला सामन्यात पुनरागमन केले. या दोन्ही फलंदाजांनी चौथ्या विकेटसाठी 80 धावांची भागीदारी केली. ट्रॅव्हिस हेडने 49 चेंडूंत 5 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 68 धावांची खेळी केली. तर मार्कस स्टॉइनिसने 29 चेंडूंत 9 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 59 धावांची खेळी केली. यानंतर टीम डेव्हिड आणि मॅथ्यू वेडने संघाला विजयापर्यंत नेले.

ऑस्ट्रेलियाच्या या विजयामुळे स्कॉटलंड टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडला असून इंग्लंड सुपर-8साठी पात्र ठरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 5th T20: भारत-वेस्ट इंडिजचा अंतिम टी-२० सामना कुठे अन् कधी पाहता येणार? LIVE Streaming, वेळ अन् TV चॅनेलची माहिती जाणून घ्या

Marathwada Graduates Constituency Election : मराठवाडा पदवीधर निवडणुकीत रंगत! नेत्यांचे फोटो दोन्ही उमेदवारांच्या प्रचार बॅनरवर; मतदार संभ्रमात!

Parli Vaijnath News : आमदार धनंजय मुंडे यांनी परळीत देवीचे दर्शन घेतले, आपल्या हाताने खिचडी प्रसाद बनवला आणि भाविकांना वाटला ही....

Marathi News Live Updates: गोरेगावात काळीज पिळवटून टाकणारी घटना; १० वर्षांच्या मुलीने १८ महिन्यांच्या चिमुरडीला ६ व्या मजल्यावरून फेकले

Death Penalty: मेरठ कोर्टाचा ऐतिहासिक निकाल! पतीला साप चावल्याचा बनाव करणाऱ्या पत्नीसह प्रियकराला फाशीची शिक्षा

SCROLL FOR NEXT