Coach Rahul Dravid Team India Journey Culminates With T20 World Cup Title sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Rahul Dravid : सतरा वर्षे लागली... टीम इंडियाच्या भिंतीने बदला घेतलाच, द्रविडचे स्वप्न पूर्ण

भारतापासून हजारो मैल दूर असलेल्या बार्बाडोसच्या ब्रिजटाऊन शहरातील केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर शनिवारी 29 जूनच्या रात्री वर्ल्ड कप जिंकून रोहित शर्माने भारतीय चाहत्यांना मोठे गिफ्ट दिले आहे.

Kiran Mahanavar

भारतापासून हजारो मैल दूर असलेल्या बार्बाडोसच्या ब्रिजटाऊन शहरातील केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर शनिवारी 29 जूनच्या रात्री वर्ल्ड कप जिंकून रोहित शर्माने भारतीय चाहत्यांना मोठे गिफ्ट दिले आहे. गेल्या 11 वर्षांपासून केवळ भारतीय क्रिकेट संघ किंवा बीसीसीआयच नाही तर 130 कोटींहून अधिक लोक ट्रॉफीच्या वाट पाहत होते.

इतर सर्वांसाठी ही प्रतीक्षा गेल्या 11 वर्षांपासून असली तरी टीम इंडियाचे मुख्य कोच राहुल द्रविडसाठी ही प्रतीक्षा 17 वर्षांची आहे. खेळाडू म्हणून 2011 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर 10 वर्षांनंतर द्रविड 2021 मध्ये पुन्हा एकदा टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये परतला पण एका नव्या भूमिकेत. कोच म्हणून संघांशी जोडल्यानंतर भारतीय संघाला चॅम्पियन बनवण्याचे ओझे त्याच्यावर होते. आणि गेल्या वर्षभरात तो दोनदा त्याच्या जवळ आला होता.

पण दोन्ही वेळा त्याला अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला. एकदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 आणि दुसऱ्यांदा वनडे वर्ल्ड कप 2023. 21 वर्षांपूर्वी म्हणजे 2003 मध्ये द्रविड संघांचा उपकर्णधार असताना ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजेतेपद जिंकण्यापासून रोखले होते.

एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 संपल्यानंतर राहूल द्रविडचा टीम इंडियासोबतचा कार्यकाळ संपणार होता. परंतु बीसीसीआयने तो टी-20 वर्ल्ड कप 2024 पर्यंत वाढवला. पण आता द्रविडने या वर्ल्ड कपनंतरच आपला प्रवास संपवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आता नशिबाचा खेळ बघा की द्रविडचा टीम इंडियासोबतचा प्रवास त्याच मैदानावर संपला.... जिथे 17 वर्षांपूर्वी त्याच्या कर्णधारपदाचा काळ संपला होता...

2007 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये राहुल द्रविड टीम इंडियाचा कर्णधार होता. आणि तेव्हा ही स्पर्धा वेस्ट इंडिजमध्ये आयोजित करण्यात आली होती. भारतीय क्रिकेट चाहते तो वर्ल्ड कप कधीच विसरू शकत नाही. कारण टीम इंडियाला ग्रुप स्टेजमध्येच लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यावेळी स्टार खेळाडूंच्या घरांवर दगडफेक करण्यात आली. हा पराभव चाहत्यांसाठी दु:खद होताच पण खेळाडूंना पराभवाच्या वेदनांसोबतच चाहत्यांचे असे वागणेही दुखावणारे होते.

त्यानंतर द्रविडने टीम इंडियाचे कर्णधारपद सोडले आणि 2007 मध्ये होणाऱ्या पहिल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये सहभागी होण्यास नकार दिला. 2011 मध्ये वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीम इंडियाचा तो भागही नव्हता. इतकं गमावल्यानंतर आणि पाहिल्यानंतर द्रविडच्या नशिबाने त्याला पुन्हा एकदा टीम इंडियासोबत वेस्ट इंडिजला आणले. केन्सिंग्टन ओव्हलवरची 29 जूनची तारीख रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासाठी जितकी खास होती तितकीच राहुल द्रविडसाठी खास होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Pune News : विनापरवाना लावणीचा कार्यक्रम; मंडळाच्या अध्यक्षांसह नृत्यांगना राधा पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

Social Media: 'Likes' मुळे वाढतोय मानसिक ताण? Post's च्या मोहात अडकतात डिप्रेशनग्रस्त लोक; संशोधनातून धक्कादायक खुलासा!

Marathi News Live Updates: तळेगाव ढमढेरे परिसरात विजेमुळे ग्रामस्थ त्रस्त

आई म्हणाली ‘चॉकलेट बंद कर’; स्क्वॉशपटू अनाहतने थेट न्यूट्रिशनिस्टलाच फोन केला! नेमकं काय घडलं? Viral Video

SCROLL FOR NEXT